पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


वति' या आपल्या वचनाची पूर्तता पुनः एकवार त्याने केली. या वेळी हा अवतार हिंदुस्थानाच्या दक्षिण भागांत झाला. ब्राह्मणकुळांत जन्म घेतलेल्या या अवतारी पुरुषाने आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षी आपलें ग्रंथलेखन पुरे केले, असा लोकप्रवाद आहे. या अवतारी तरुणाचे नांव शंकराचार्य असें आहे. केवळ सोळा वर्षांच्या वयांत या बाल आचार्यांनी जी ग्रंथसंपत्ति निर्माण केली आहे, ती पाहून आश्चर्याने सारे जग थक्क होऊन जाते. पूर्व काली भरतभूमीनें जें धर्मकार्य केले आणि त्या वेळी ती पावित्र्याचे वसति स्थान होऊन राहिली होती तेंच पावित्र्य तिला पुन्हां प्राप्त करून द्यावे, असा या आचार्यांचा हेतु होता; पण हिंदुस्थानाची अवनति या वेळी कोणत्या थराला पोचली होती, याचा क्षणभर विचार केला म्हणजे हे कार्य किती दुष्कर होतें हे तेव्हांच दिसून येईल, या वेळेच्या परिस्थितीचे अल्पसें वर्णन मी तुम्हांस आधी सांगितलेंच आहे. आजमितीसहि जे भयंकर प्रकार हिंदु स्थानांत तुम्हांस आढळून येतात आणि जे नाहीसे करण्यासाठी तुम्ही इतकी धडपड करितां, त्यांची उत्पत्ति या परिस्थितीतूनच झाली आहे. अवनतीचें साम्राज्य त्या काळी अकुतोभय चालू होते. तार्तार, बलुची इत्यादि अनेक पशुतुल्य रानटी जाती हिंदुस्थानांत आल्या होत्या. येथे आल्यानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी केला. आमच्याशी त्यांची सरमिसळ होऊन गेली. त्यांच्या चालीरीतीहि आमच्यांत मिसळून गेल्या; आणि अशा रीतीने हिंदी राष्ट्रांत भयंकर चालीरिती आणि पशुतुल्य आचरण यांचा सुकाळ झाला. स्वतःच्या विनाशकाळी बौद्धधर्माने आपली वारसदारी म्हणून जो कांहीं ठेवा मागे ठेविला तो हाच; आणि शंकराचार्यांनाहि या ठेव्याचा स्वीकार करू नच आपला पुढील मार्ग चोखाळणे अवश्य होतें. आचार्यांच्या काळानंतर हिंदुस्थानाला जें स्वरूप प्राप्त झाले, तें वेदान्ताने बौद्ध अवनतीवर मिळवि लेल्या विजयामुळेच होय. आचार्य गेले, तथापि हा झगडा अद्यापिहि पुरा झाला नसून तो तसाच पुढे चालू आहे. श्रीशंकराचार्य महान् तत्त्व वेत्ते होते. बौद्धधर्माची अंतिम तत्त्वे आणि वेदांत धर्म यांत फारसा फरक नाहीं हे आचार्यांनी सिद्ध केलें. बौद्ध भिक्षूना स्वधर्माच्या आद्यप्रवर्तकाची तत्त्वं यथार्थपणे न समजल्यामुळेच भलत्या मार्गाने जाऊन त्यांची अवनति झाली. बुद्धदेवाच्या शिकवणीचे रहस्य त्यांच्या गळी न उतरल्यामुळे जीवात्मा