पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.२१९.


हिंदुस्थानांत मूर्तिपूजेचा प्रचार बौद्ध धर्मानंतर झाला. वर्षा दोन वर्षांपूर्वी एका रशियन गृहस्थाने एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यांत ख्रिस्तचरित्र सांगत असतां येशू ख्रिस्त जगन्नाथाच्या देवालयांत ब्राह्मणी धर्म शिकण्या करितां गेला असल्याचे सांगितले आहे. पण ब्राह्मणी धर्मातील मूर्तिपूजा, आणि स्वतःस श्रेष्ठ समजून इतरांपासून विभक्त राहण्याचा त्यांचा बाणा या गोष्टींनी ख्रिस्ताचें मन कंटाळून बौद्ध लामाकडे तो निघून गेला, असाहि शोध या रशियन ग्रंथकाराने लाविला आहे. हिंदुस्थानाच्या इतिहासाची यत्किंचितहि माहिती ज्याला आहे, त्याला या दंतकथेचा फोलपणा तेव्हांच पटेल. जग न्नाथाचे देवालय बौद्धांचे आहे, ही गोष्ट सर्वविश्रुत आहे. हे प्राचीन देव स्थान आणि त्याबरोबरच कित्येक दुसरीहि बौद्धांपासून हिरावून घेऊन हिंदु धर्मानुयायांनी ती आपली देवस्थाने बनविली. अशाच गोष्टींची पुनरावृत्ति यापुढे आणखीहि कित्येक वेळां होणार आहे. जगन्नाथाच्या देवालयाची हकीकत अशा प्रकारची आहे. ख्रिस्ताच्या काळी तेथे एकहि ब्राह्मण नव्हता. इतिहास अशा प्रकारचा असतां ब्राह्मणी धर्म शिकण्याकरितां येशू ख्रिस्त जगन्नाथास गेला, हा शोध या रशियन पंडिताने कोठून लाविला हे समजणे दुरापास्त आहे. 'सर्वां भूती दया' हे बुद्धदेवाच्या धर्माचें आदितत्त्व आहे. बौद्ध धर्म हा मुख्यत्वेकरून अत्युच्च नीतिप्रवर्तक धर्म आहे. तथापि हा धर्म इतका उच्च असतांहि हिंदुस्थानांतून तो क्रमशः नाहीसा होत गेला; आणि त्याच्या नाशानंतर जें धर्मस्वरूप तेथें शिल्लक राहिलें तें अत्यंत कि ळसवाणे होते. यांत घाणेरडे प्रकार किती होते, याचे यथातथ्य वर्णन कर ण्यास आज मला अवकाश नाही, आणि तसे करण्याची माझी इच्छाही नाही. अत्यंत उद्वेगजनक आचार, अत्यंत भयंकर पूजाप्रकार आणि अत्यंत किळसवाणी चोपडी ही या काळी निर्माण झाली. जितक्या घाणेरड्या क ल्पना मनुष्याच्या मेंदूत निर्माण होणे शक्य आहे आणि जितके घाणेरडे शब्द मानवी हस्ताने लिहिले जाण्यासारखे आहेत, तितक्या साऱ्या कल्पना या काळी प्रसार पावून तितके घाणेरडे शब्द या काळी लिहिले गेले. क्रूर पशूना शोभतील असे अत्याचार धर्माच्या वेषाने समाजांत खुशाल वावरू लागले. बौद्ध धर्माचे विकृत रूप अशा प्रकारचे झालें.
 पण भरतभूमीने अजून जगावें, असा ईश्वरी संकेत होता; आणि या- करितां त्याने पुनः एकवार अवतार घेतला. 'यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भ-