पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.२१५


कारण, गोपींना वाणिज्य ठाऊक नव्हते. कोणत्या प्रकारच्या भक्तीचे फळ कोणत्या प्रतीचे मिळते हा हिशेब त्यांना समजत नव्हता. मग असल्या गैर हिशेबी गोपी ह्या वणिजनांना खपणार कशा ?
 आतां गोपींच्या निष्काम भक्तीचें हें अत्युच्च वातावरण सोडून आपण जरा अलीकडे येऊ. श्रुतींचा खरा अर्थ भगवद्गीतेंत जसा स्पष्ट झाला आहे, तसा दुसऱ्या कोठेहि तो पाहण्यांत येत नाही. किंबहुना, याहून अधिक स्पष्ट अशा स्वरूपाचे श्रुतींचे विवरण करणेहि शक्य नाही. श्रुति आणि आरण्यके यांचे रहस्य जाणणे फार कठिण आहे. यांचा अर्थ जो तो आपापल्या परी लावू पहात असतां मतांचा आणि मतांतरांचा विलक्षण गलबला झाला आहे असें पाहून परमेश्वराने स्वतः अवतार धारण केला. ज्याच्या श्वासापासून श्रुती उद्भवल्या, त्यानेच त्यांचा खरा अर्थ सांगितला पाहिजे हे उघड आहे; आणि तो अर्थ सांगण्याकरितांच भगवान् श्रीकृष्ण अवतरले आणि गीतेच्या रूपाने हे विवरणाचे कार्य त्यांनी केले. श्रुतींच्या याहून अधिक चांगल्या अर्थाची गरज हिंदुस्थानाला नाहीं; आणि जगालाही ती नाही. श्रुति आणि आरण्यकें यांवर ज्या काही टीका गीतातत्त्वानंतर झाल्या, त्या टीकाकारां नाहि पुष्कळ प्रसंगी श्रुतींचे रहस्य समजले नाही. त्या ओघाची दिशा त्यांच्या ध्यानात आली नाही हे मोठे नवल आहे. एखाद्या अद्वैतवाद्याने एखाद्या उपनिषद् ग्रंथावर टीका सुरू केली म्हणजे त्यांत पुष्कळ विलक्षण प्रकार तो करितो. मूळ संहितेंत द्वैतप्रतिपादक कांहीं मजकूर आला की, त्याची विलक्षण ओढा ताण करून आणि त्याला हवातसा पिळवटून त्यांतून स्वमतप्रतिपादक असा अर्थ तो निर्माण करितो. अशा रीतीने एकंदर संहितेला आपले मत बोलून दाखवावयास तो लावीत असतो. असला प्रकार गीतेंत तुम्हांला कोठेही आढळावयाचा नाहीं; कारण, मनुष्यप्राण्याची उत्क्रान्ती पायरीपायरीने होत असते, हा सिद्धांत भगवंताला पूर्णपणे अवगत आहे. याकरितां द्वैत आणि अद्वैत या पायऱ्या आपापल्या ठिकाणी असणें हें उचित आहे, असे तो म्हणतो.जडाक इन सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून सूक्ष्मतराकडे आणि द्वैतापासून शुद्ध अद्वैताकडे मनु ष्यप्राण्याचा प्रवास हळू हळू होत असतो हे तो जाणून आहे. गीतेंतही हेच अनुसंधान सर्वत्र बाळगिले आहे. कर्मकांडाचा विचारहि गीतेने केला आहे, आणि कर्म प्रत्यक्ष मोक्षादायी नसले तरी परंपरेने मोक्षमार्गावर तुम्हांस तें