पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.२११


अर्थ लक्षात आला नसतांहि त्याचा विपर्यास करणारे हजारों मूर्ख आजहि आपल्या समाजांत तयार आहेत. 'गोपीचे प्रेम' हा शब्द उच्चारतांच ज्यांना थरकाप भीति वाटते, शुद्ध नरकासन्निध तर आपण आलों नाहींना अशी शंका उत्पन्न होऊन त्यांचे चित्त भयाकुल होते. याचा वास्तविक अर्थ हाच की त्यांची चित्तें अपवित्र आहेत. आपल्याच रक्तामासाचे असे अनेक मूर्ख आपणांमध्ये आज वावरत आहेत. त्यांना मी इतकेंच म्हणतों की बाबांनो, आपली अंत: करणे आधी शुद्ध करा. गोपीचा इतिहास प्रत्यक्ष शुकदेवाने स्वमुखानें गाइला आहे, एवढे तरी लक्षात ठेवा. ज्याने हा इतिहास गाइला तो दुसरा तिसरा कोणी नसून बाल ब्रह्मचारी होता. जो सदाचा पवित्र त्या पवित्रतम शुकदे वाने गोपींच्या प्रेमाचा हा उज्वलतम इतिहास सांगितला आहे. आपल्या चित्तांत कसलीहि आकांक्षा यस्किंचित तरी शिल्लक असेल तोपर्यंत ईश्वरवि वयक प्रेमाच्या अत्यल्प किरणाचाहि प्रवेश तेथे व्हावयाचा नाही. असे होणे ही गोष्ट सर्वथा अशक्य आहे. काहीतरी आकांक्षा चित्तांत शिल्लक ठेवून पर मेश्वराचे भजन करणे आणि वाण्याचे दुकान घालणे ही कमें सारख्याच योग्य तेची आहेत. परमेश्वरा, मी तुझी भक्ति करितों तिच्या बदल्यात मला अमुक दे असे म्हणणे हे वाणिज्य नव्हे तर काय? यावर परमेश्वरहि उलट म्हणू लागतो की, ठीक आहे; अमुक कर्म तूं केले नाहीस, तर तूं मेल्यावर पाहून घेईन. तुला तापलेल्या तव्यावर भाजून काढीन. असल्या प्रकारच्या क्षुद्र कल्पनांना आमच्या चित्तांत अस्तित्व आहे, तोपर्यंत वेडे करणारे गोपींचे प्रेम आम्हांस कोठून समजणार ? तें समजून घेण्याची इच्छा असेल तर धनतृष्णा आणि कीर्तितृष्णा आपल्या हृदयांतून प्रथम हद्दपार करा आणि या क्षणभंगुर जगाचे अस्तित्वहि विसरून जा. असे झाले तरच गोपींच्या प्रेमाची थोडी तरी कल्पना तुम्हांस येईल. या प्रेमाला जगाचा स्पर्श झाला की, तें ताबडतोब विटाळते. मोठे नांव, मोठी कीर्ति, विपुल संपत्ति इत्यादि ऐहिक तुच्छ पदार्थांचा पूर्ण विसर तुम्हांस प्रथम पडू द्या. तसे झाले तरच गोपींच्या प्रेमाचे रहस्य तुम्हांस समजेल. या प्रेमाचे स्वरूप इतकें पवित्र आहे की, ऐहिक वस्तूंच्या पापाचा संपर्कहि त्याला खपावयाचा नाही. जीवात्मा पूर्ण निष्कलंक होईपर्यंत या प्रेमाचा अंशहि त्याला सांपडावयाचा नाही. स्त्री पुरुष भावना, पैशाची हांव आणि कीर्तीची इच्छा यांच्या उकळ्यांवर उकळ्या आमच्या चितांत फुटत