पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिदुस्थानातील तत्त्ववेत्ते.२०९


प्रत्यक्ष कृतींतहि ते दाखवीत. भगवान् श्रीकृष्णाचें सारें चरित्र गीताशास्त्राला पूर्णपणे धरून आहे. सर्व कर्म करावयाचें परंतु त्यांत कोठेहि गुंतावयाचे नाही, या त्यांच्या उपदेशाचे जीवंत स्पष्टीकरण त्यांच्या साऱ्या चरित्रभर आढळून येते. त्यांनी सिंहासनाचा त्याग केला. आपणांस कधी काळी सिंहा सन होते, याची आठवणहि त्यांस पुन्हां झाली नाही. ज्यांच्या दृष्टिपा ताने संबंध राज्ये उलथींपालथी झाली, त्यांनी स्वतः राजा होण्याची अपेक्षा धरिली नाही. लहानपणी गोपीबरोबर खेळणारा कृष्ण अखेरपर्यंत तसाच साधा भोळा कृष्ण राहिला. गोपींची क्रीडा हा श्रीकृष्णांच्या आयुष्या तील एक लोकोत्तर भाग आहे. या चरित्राचा हा भाग आपणांसारख्या सामान्य जनांस समजणे शक्य नाहीं; आणि स्वतः पूर्ण पवित्र बनेपर्यंत तो समजण्याची आशाहि कोणी धरूं नये. अत्यंत पवित्र अशा प्रेमाचें हैं स्वरूप येथे अत्यंत विशाल झाले आहे. वृंदावनांतील गोपीक्रीडेचे रहस्य कोणालाहि समजावयाचें नाही. भगवान् श्रीकृष्णाच्या भक्तिरसाचें आकंठ पान करून जो झिंगला असेल त्यालाच हे रहस्य समजेल. गोपींच्या शुद्ध आणि निर्व्याज प्रेमाच्या वाहणाऱ्या झऱ्याचे आकलन कोणास कर वेल! ज्या प्रेमांत स्वर्गाची अपेक्षा नाही, ज्या प्रेमांत मृत्युलोकाच्या अस्तित्वाचाहि विसर पडला आणि ज्या प्रेमांत मुक्तीचीही अपेक्षा शिल्लक राहिलेली नाही त्याचे रहस्य कोणी जाणावें? व्यक्त परमेश्वर आणि त्याचेच अव्यक्त रूप या दोन मतांतील तंट्याचा निकाल येथेच लागलेला आहे हे अवश्य ध्यानात ठेवा. मानवी जीविताचे अत्युच्च शिखर म्हणजे व्यक्त परमे श्वर असून अव्यक्त रूप हे फक्त तत्त्वदृष्ट्या जाणावयाचे आहे. अव्यक्त रूप सर्व विश्वभर पसरले असून हे सारे वस्तुजात त्याचेच स्पष्ट रूप आहे. केवळ शास्त्रदृष्ट्या हे म्हणणे आपणांस पटले असले, तरी आपल्या मनोमूमिकेला कोणत्या ना कोणत्या व्यक्त स्वरूपाची आवश्यकता भासत असते. जे आ पल्या डोळ्यांनी पाहतां येईल, ज्याचे ग्रहण सर्व इंद्रियांनी करितां येईल आणि ज्याच्या पायांपाशी आमचे सर्व अंतर्गत आम्हांस खुलें करितां येईल, असें स्वरूप आम्हांस हवे. अशा दृष्टीनेच एखाद्या विशिष्ट रूपाची योजना आम्ही माणसें करीत असतो. याचा अर्थ हाच की, व्यक्त परमेश्वर म्हणजे मानवी मनाची अत्युच्च कोटीची कल्पना तथापि शुद्ध बुद्धीने येथपर्यंत मजल


स्वा० वि० ख०-९-१४