पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते. १९९


शृतींचे खरे रहस्य जगाला सांगणारा एक महापुरुष इतकीच भगवान् श्रीकृ ष्णची ख्याति आहे. हीच गोष्ट इतर अवतारी पुरुषांसही लागू आहे; आणि त्याप्रमाणे शृतींतील ऋषिवर्गासही हाच नियम लागू आहे. मनुष्याला पूर्णत्व येण्यासाठी ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता आहे, त्या साऱ्यांची तरतूद शृति मातेने आगाऊच करून ठेविली आहे. असे आमचें आदितत्व आहे. वेदांत नाहीं असें नवें तत्त्व एकही आढळावयाचे नाही. सर्व ज्ञानाची परिसीमा ऐक्य हीच आहे. ऐक्याची सिद्धि झाली म्हणजे तेथे ज्ञानाचीही परिसमाप्ति होते. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हे सर्व एकरूप आहे, या निश्चयापर्यंत तुम्ही एकवार पोहोंचला म्हणजे त्यापलीकडे जाण्यास तुम्हास अवकाशच उरत नाहीं; आणि अशा अवकाशाच्या अभावी ज्ञानाचीही गरज उरत नाही, हे उघड आहे. या एकरूपतेपर्यंत शृतींनी आधीच मजल मारिली आहे आणि आतां त्यापलीकडे जाणे शक्य नाही. 'तत्वमसि' हा मूल सिद्धांत ज्या दिवशी सिद्ध झाला, त्याच दिवशी सर्व ज्ञान पूर्णदशेस आले; आणि हा सिद्धांतही वेदांतर्गत आहे. आता हे तत्त्व अनुभवास कसे आणावयाचे इतकाच प्रश्न बाकी राहिला. परिस्थित्यनुरूप मार्गदर्शकाची गरज तेवढीच शिल्लक राहिली. बदललेल्या परिस्थितीला अनुरूप अथवा काळाला अनुरूप आणि स्थलाला अनुरूप असा मार्गदर्शक मात्र आपणास हवा. मार्गाची सिद्धि पूर्वीच झाली असून केवळ वाटाड्याचे काम मात्र शिल्लक राहिले आहे. जुन्या मार्गाने लोकांना नेणे इतकेच काम करण्याकरितां अवतारी पुरुषांचा, ऋषिजनांचा आणि संतसत्पुरुषांचा जन्म झाला. भगवान् श्रीकृष्णांनी स्वतःच गीतेंत म्हटले आहेः-
 “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदा त्मांनं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥" हिंदुधर्माच्या मूल उत्पत्तीचे स्वरूप अशा प्रकारचे आहे. यावरून काय दिसून येतें ? हेच की, एका पक्षी कालस्थलातीत अशा स्वरूपाची तत्त्वें कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या नियत स्थली उभी आहेत. दुसऱ्या कोणत्याही पायाचा अवलंब त्यांना करावा लागत नाहीं; इतकेच नव्हे तर विवेचक बुद्धीच्या आश्रयाची गरजही त्यांस नाही. मग कोणा मोठ्या ऋषिवर्याचा आश्रय त्यांना नको हे सांगण्याची जरूर नाही. हे -