पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १९३


मी काय विधवा आहे ? मला विधवा समजून असे मूर्खपणाचे प्रश्न तुम्ही मला विचारतां काय ? की मी स्त्री आहे म्हणून त्यांच्या उन्नतीबद्दल मला विचारतां ? हा प्रश्न स्त्रियांचा आहे आणि याचे उत्तर त्याच देतील. आपा पल्या अडचणींची वासलात ज्याची त्यानेच लावली पाहिजे. स्त्रियांच्या बऱ्यावाइटाचा विचार करणारे तुम्ही डुड्ढच्रार्य कोण ? जगांतील प्रत्येक विध वेवर आणि स्त्रीवर वाटेल ती सत्ता चालविण्यास तुम्ही काय सर्वसत्ताधीश परमेश्वर आहां? हा नाद आतां तुम्ही सोडून द्या इतकेंच मी तुम्हांस सांगतो. आपल्या बऱ्यावाइटाचा मार्ग त्याच शोधून काढतील. अरे जुलमी सुलता नांनो, कोणाचेही बरे वाईट करणे आपल्या हाती आहे या भ्रमानें तुम्हांस पछाडलें आहे ! आता हा भ्रम तुम्ही प्रथम झुगारून देऊन दूर व्हा पाहूं. स्त्रियांच्या बर्यावाईटची चिंता तुम्हांस नको. त्यांची चिंता करण्यास त्या स्वतःच समर्थ आहेत, आणि सर्वांची चिंता परमेश्वरास आहे. त्याची कृपा दृष्टि सर्वांवर सारखीच असते. सर्वांचा मार्गदर्शक तोच आहे. आपण सर्वज्ञ आहों अशी घमेंड बाळगणारे तुम्ही कोण? प्रत्येक जीवात्मा परमात्म्याचा अंश आहे हे तुम्हांस ठाऊक नाहीं काय ? ज्या अर्थी परमेश्वराहून आपणांस अधिक सत्ता आहे असे समजण्याचे धाष्टर्थ तुमच्या अंगी आहे, त्या अर्थी ईश्वरद्रोही हाच किताब तुम्हांस दिला पाहिजे. तुम्ही आपल्यापुरता विचार करा. स्वतःच्या बऱ्यावाईट कर्मापलीकडे पाहण्याचे कारण तुम्हांस नाही. तुमच्या स्वतःच्या कर्तबगारीला पुरून उरेल इतका प्राचीनकर्माचा सांठा तुमच्या पाशी आहे, त्याची वासलात अगोदर लावा. लोकांच्या स्तुतीला भुलून या भलत्याच फंदांत यापुढे पडूं नका. लोकांना काय, अमका मोठा समाज- सुधारक म्हणून त्याला देव्हा-यांत बसवतील, महर्षि म्हणून स्तुतिस्तोत्रांचा वर्षाव त्याजवर करतील, आणि या स्तुतीच्या निनादानें आकाश सुद्धा भरून सोडतील. शेंकडों मूर्ख तुमची आरती करण्यास सिद्ध होतील; पण ध्यानांत ठेवा की तो सर्वसाक्षी क्षणभरही झोंपी जात नाहीं; आणि आजच्या या स्तुतिस्तोत्रांची सव्याज भरपाई येथे अथवा इतउत्तर केल्यावाचून तो राह णार नाही.
 'जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत' ही आज्ञा सदैव लक्ष्यांत बाळगा. कोणाचे आपण बरें वाईट करूं शकू अथवा कोणाला मदत करूं

स्वा० वि० ख०-९-१३.