पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम


श्रीशंकराचार्यांनी याहून थोडे अधिक औदार्य दाखविले. उपनिषदांचा अभ्यास गृहस्थांनीही करावा अशी अनुज्ञा त्यांनी दिली. या अभ्यासाने त्यांचे नुकसान न होतां थोडाबहुत फायदा होईल असा आचार्यांचा आशय होता. पण अद्यापिही या बाबींत पुष्कळ गैरसमज पसरला आहे. हे ग्रंथ केवळ अरण्य वासी जनांच्या मात्र उपयोगी आहेत असें पुष्कळांस वाटते. उपनिषग्रंथांचे खरे रहस्य तुम्हांस पाहावयाचे असेल, तर ते एकाच जागी तुम्हांस सांपडेल. वेद निर्माण होण्यास ज्यापासून स्फूर्ति मिळाली त्याच भगवान् श्रीकृष्णाने गीताग्रंथांत या साऱ्या रहस्याचे उद्घाटन स्वतः केलें आहे. श्रुतींवरील उत्त- मोत्तम टीका म्हटली म्हणजे.हीच. तुम्ही कोणत्याही धंद्यांत पडलेले असा, अथवा समाजांत तुमची कोणतीही पायरी असो, गीतेच्या द्वारे हे रहस्य तुम्हास हस्तगत करून घेता येईल. अमुक एका व्यक्तीला येथे अधिकार नाहीं असें नाही. वेदान्ताचे हे सिद्धांत आतां व्यवहारांत दिसू लागले पाहि जेत. आतां आपला अरण्यवास संपवून त्यांनी संसारांत आले पाहिजे. गुहा सोडून घरांचा आश्रय त्यांनी आतां केला पाहिजे. जगांतील एखाद्या विशिष्ट परिस्थितीत गुंतून न राहता त्यांनी सर्वत्र पसरले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शालागृहांत, कोळ्यांच्या घरांत, गरिबांच्या झोपडयांत, श्रीमंतांच्या राजम हालांत, वकिलांच्या कोठडीत आणि बड्या न्यायाधीश साहेबांच्या अंतर्ग्रू हांत त्यांनी आतां प्रवेश केला पाहिजे. कथापुराणांतूनही त्यांनी शिरले पाहिजे. प्रत्येक पुरुषाला, स्त्रीला आणि मुलालासुद्धा त्यांनी आपापले कर्तव्य शिक विले पाहिजे. कोणी कोणत्याही परिस्थितीत असो, त्याची कर्तव्याची जाणीव त्यांनी त्याला करून दिली पाहिजे.
 वेदान्ताचा अभ्यास सर्रास सुरू झाला, तर समाजाची घडी बिघडेल अशी धास्ती पुष्कळांस वाटते. पण अशी भीति वाटण्याचे काही कारण नाही. कोणी उपनिषदांचा अभ्यास सुरू केला म्हणून आपल्या कक्षेच्या बाहेर त्याला उडी मारता येते असे नाही. एखाद्या मासेविक्याने वेदान्त वाचला म्हणून आपला धंदा सोडून तो गिरिकंदरांत जाईल ही भीति अस्थानी आहे. धर्मानें अनंत मार्ग दाखविले आहेत. हे सारे रस्ते सोडून त्याहून एखादा वांकडा मार्ग कोणी नवाच काढील, अशी भीति बाळगण्याचे कारण नाही. मार्ग कोणताही असो, त्याचे मनःपूर्वक आचरण तुम्हीं केलें, तर तोच तुम्हांस