पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १८५


द्रावरील तरंगांसारखी आहेत. या आत्मसमुद्राचे स्वरूप अखंड आहे. तें कधी बदलत नाही. ते कधी लहानमोठे होत नाही. तें सर्वदा एकरूप असते.
 अहो, मुलांना नैतिक शिक्षण द्या अशी ओरड अलीकडे सर्वत्र ऐकू येते. पण नीतीचा मूळ झरा आमच्या जुन्या ग्रंथांत आहे, याचा विचार कोणीच करीत नाही. या मूळ झ-याचे पाणी पिण्यासाठी सारे जग आज उत्सुक होऊन बसले आहे. त्याची अतिशय तहान त्याला लागली आहे. ही तहान स्याला भागवावयाची असेल, तर आमच्या उपनिषदांकडेच त्याने धांव घेतली पाहिजे.
 आतां आम्हां हिंदी लोकांस कशाची जरूर आहे, याचाही विचार करणे भाग आहे. आपणालाही याच गोष्टीची वास्तविक जरूर आहे. परकीयांना ही जरूर एकपट असेल, तर आम्हाला त्यांची जरूर शतपट अधिक आहे. उपनिषदें म्हणजे जीवनदायी अमृताचा सागर आहे. आमचे पूर्वज महान् ऋषी होते असा अभिमान आम्ही वाहतो. या साऱ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. तथापि इतरांच्या मानाने पाहतां सांप्रत आपण दुबळे-फारच दुबळे आहोत हे तुमच्या तोंडावर स्पष्टपणे तुम्हांस मला सांगितले पाहिजे. आधी आमचे शरीरबळ इतरांच्या मानाने कमी. या शरीरदौर्बल्यामुळेच अनेक दुःखें आपणावर कोसळतात. आपणांस भोगाव्या लागणाऱ्या यातनांपैकी किमानपक्ष तिसरा हिस्सा तरी याच दुबळेपणामुळे उत्पन्न झालेला आहे. शरिराच्या दुबळेपणाने अंगांत आळस भरतो. काम करण्याची हुरूप राहत नाही. मग मन दुबळे होऊ लागते. चार माणसेंसुद्धा सुखाने एकत्र नांदे- नाशी होतात. मग मोठ्या संघाची आणि संघटनात्मक कार्याची गोष्ट कशाला बोलावी ? कोणाला कोणाबद्दल आदर अथवा प्रेम नाही. आपण शुद्ध स्वा र्थांचे पुतळे बनलो आहों. एखाद्या कार्यासाठी तीन माणसें जरी एकत्र जमलीं तरी आरंभापासूनच परस्परांचा द्वेष ती करीत असतात. त्यांपैकी प्रत्येकाला सगळा लाडू हवा असतो; इतकेच नाही तर दुसऱ्याला भाकरीचा तुकडाही मिळू नये अशी त्याची इच्छा असते. मग परस्पर मत्सराला काय तोटा ? आज आम्ही अशा प्रकारच्या स्थितीत पडलो आहों. कसल्याही प्रकारची संघटना नसलेल्या बाजारबुणग्यासारखी आपली स्थिति आहे. फाटाफूट झालेल्या असल्या घोळक्यांत संघशक्ति कधी काळी उत्पन्न होईल अशी