पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १७७


 अशाच प्रकारची आणखीही उदाहरणे असंख्य देता येतील; पण वेळाच्या अभावी मला तसे करता येत नाही. उपनिषदांतील विचार किती उच्च, त्यां- तील उदात्ततेचे चित्र किती बहारीचे आणि काव्य किती मनोहारी आहे हे यथास्थित रीतीने दाखवावयाचे म्हटले तर तें काम अशा शेंकडों व्याख्या नांनीही व्हावयाचें नाही. याकरितां ही बाजू इतकीच सोडून आपण आपला पुढील मार्ग पाहूं.
 उपनिषदांची भाषा अशा प्रकारची आहे की, तिचा प्रवेश थेट तुमच्या अंतःकरणांत एकदम होतो. तिच्यांत आढयावेढयांचा अथवा बोबडेपणाचा दोष तुम्हांस कोठेही आढळावयाचा नाही. विचार आणि भाषा ही दोन्हीही भा ल्याच्या टोकासारखी सरळ आणि तीक्ष्ण असल्यामुळे तुमच्या मनाला स्पर्श हो प्याबरोबर ती थेट अंतःकरणांत शिरतात. त्यांत लेचेपेचेपणाचा अंशही तुम्हांस कोठे सांपडावयाचा नाही. त्यांत तीन चार भावार्थही निघावयाचे नाहीत. त्यांतून उद्भवणारा प्रत्येक सूर अगदी निकोप आणि निष्कंप असल्यामुळे त्याचा परिणाम जितका व्हावयाचा तितका पूर्णत्वानें तो होतो. त्यांत कोठे चक्रव्यूह नाहीत अथवा गिरक्याफिरक्या नाहीत. निरर्थक शब्दजाल अथवा साखरेची साल काढून मेंदूला व्यर्थ शिणविणाऱ्या विचारांचा काथ्याकूटही त्यांत नाही. कित्येक लेखांची मजा अशी असते की ते वाचता वाचतां भांबा- ऊन जाऊन अखेरीस वाचक अगदी वेडा बनतो. आपण काय वाचलें याचेही पुरतेंसें स्मरण त्यास राहत नाही. अशा प्रकारचे लेख हे लेखकाच्या बुद्धीच्या अवनतावस्थेचे चिह्न होय. असा प्रकार उपनिषदांत कोठेही नाही. रूपकांची आणि अलंकारांची फाजील रेलचेल कोठेही नाही. विशेषणामागे विशेषणे असलाही प्रकार कोठे नाही. असल्या प्रकारांनी अपेक्षित अर्थ इतका लोपून जातो की तो शोधून काढतां काढतां बिचारा मेंदूही थकून जातो आणि अखेरीस बेशुद्ध झाल्यासारखा जागच्याजागींच थिजून बसतो; व असल्या प्रचंड चक्रव्यूहांतून बाहेर कसे पडावें हे त्यास सुचेनासें होतें. बुद्धीच्या गतवैभ- वाची ही चिन्हें उपनिषत्कालापर्यंत दृष्टीस पडत नव्हती. हे ग्रंथ मनुष्यकृत असतील तर ज्या मानवकुलांत ते जन्म पावले त्याच्या मानसिक जोमाला अद्यापि उतरती कळा लागली नव्हती असें निःशंकपणे म्हणता येईल.
 उपनिषदांनी जर काही गोष्ट विशेषेकरून मला शिकविली असेल, तर ती मनोबल ही होय. हीन बलाला मोक्ष नाही हे तत्त्व उपनिषदें जणूं काय

स्वा०वि० ख०-९-१२