पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] एक उघडे रहस्य. १३

नाही. मीही असाच आहे. साऱ्या इंद्रियांच्या द्वारें मी कमें करतो. जगांतील प्रत्येक वस्तूच्या द्वारें माझें कार्य चालू आहे; तथापि सत्कार्य अथवा अकार्य यांची कोणतीही पुण्यपापें मला लिप्त करू शकत नाहीत. कोणताही कायदा मला बांधू शकत नाही. मी कायद्याच्या पलीकडचा आहे. कर्मही मला बाधा करू शकत नाही; कारण मी कर्माचा मालक असून ते माझे गुलाम आहे. मी पूर्वी होतो, सध्या आहे आणि पुढेही असणारच. मी सदा एकरूप आहे.
 लौकिक वस्तूंत माझी सुखरूपता केव्हांच गुंतलेली नव्हती. दाराधनसुतांच्या ठिकाणी मी केव्हांच बद्ध झालेला नव्हतों. अनंत नीलाकाशासारखा मी आहे. नीलाकाशावरून अनेक रंगांचे ढग इतस्ततः परिभ्रमण करीत असतात. ते क्षणभर असतात आणि मग नाहीसे होतात. ते नाहीसे झाले म्हणजे आकाशाची नीलिमा पूर्वीप्रमाणेच कायम असते. ढगांच्या रंगाने तिचा रंग पालटत नाही. सुख आणि दुःख, चांगले आणि वाईट अशा प्रकारच्या द्वंद्वांचा गराडा क्षणभर मजभोंवतीं पडेल आणि माझ्या आत्म्याचे स्वरूप ती द्वंद्वे क्षणभर झांकून टाकतील; पण त्यामुळे माझ्या आत्म्याच्या स्वरूपांत रतिभरही अंतर पडणार नाही. ही द्वंद्वेक्षणाभऱ्याने नष्ट होतील; कारण ती मुळांतच अनित्य रूपाची आहेत. मी सर्वदा प्रकाशमान आहे; कारण माझें रूप नित्य आहे. मला काही संकट प्राप्त झालें तरी तें अनित्य असल्यामुळे नष्ट होईल हेही मला माहीत आहे. केवळ मी एकच नित्य आहे आणि मला कशाचाही स्पर्श होऊ शकत नाही. मी नित्य आणि सदा मुक्त आहे, अशा प्रकारचे वर्णन एका प्राचीन आर्यकवीनें केलें आहे.
 वेदान्ताने हा अमृताचा पेला आपणापुढे केला आहे. यांतील रसाचें प्राशन आपण करूं या, म्हणजे आपण अमर होऊ. भीति प्रथम सोडून द्या. आपण अनित्य आहों, क्षुद्र आहों, वाईट आहों असल्या भावनांना आपल्या चित्तांत थारा देऊ नका. आपणाला मरण केव्हांच नाही, मग मृत्यूची भीति कशाला ?
 आपले हात कामांत गुंतले असतांही मनानें 'सोऽहं सोऽहम् ' असें म्हणा. सदोदित हेच चिंतन करा. ध्यानी-मनी-स्वप्नीं हाच जप चालू द्या. हे