पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.१७१


असा अर्थ आहे' असें तो तुम्हांस चापून सांगेल. कित्येक वेळां तर याहू- नही विलक्षण अर्थ निर्माण करून द्वैत मताच्या टीकाकारांनी आपल्या टीका सजविल्या आहेत. द्वैतमताला पोषक असे वचन जसेच्या तसेंच राखावें आणि अद्वैतदर्शक वचनाची ओढाताण करून आपल्या इच्छेस येतील ते अर्थ त्यांतून निर्माण करावे, अशा मार्गाचा अवलंब त्यांनी केला आहे. संस्कृत भाषा सामान्यतःच फार भानगडीची आहे; आणि त्यांतून श्रुतींची भाषा तर फा- रच जुनी. दुसरे असे की संस्कृत भाषेत एकाच शब्दांतून अनेक अर्थ संभ- वतात आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात. यामुळे एका शब्दाच्या अर्थाबद्दलही युगानुयुगें वाद घालीत बसणे अशक्य नाही. एखाद्याने काहीही अक्षरांची बडबड केली तरी तिचा सुसंगत अर्थ एखादा पंडित लावून दाख- वील. त्याच्या मनात आले पुरे की एकएका अक्षराचा कीस पाडून आणि आपल्या बुद्धीच्या सांच्यांत घालून त्या निरर्थक बडबडीचा अर्थही तो तु म्हांस करून दाखवील. मग हा अर्थ खरा आहे हे सिद्ध करण्याकरितां अनेक ग्रंथांतून समानार्थक वचनें तो काढील आणि व्याकरणाचे शेंकडों नियमही तो तोंडपाठ म्हणेल. उपनिषदांचे खरे रहस्य हस्तगत करण्यास कोणी नि घाला म्हणजे त्याच्या मार्गात या मोठ्या अडचणी उभ्या राहतात. परमेश्व- राच्या कृपेने ज्या महानुभावाची संगति घडण्याचे महद्भाग्य मला प्राप्त झालें होतें, तो जितका द्वैती तितकाच अद्वैती आणि जितका भक्त तितकाच ज्ञानीही होता. या सत्संगामुळेच उपनिषदांचे खरें हृद्गत जाणण्याचा मार्ग मला उप- लब्ध झाला. टीकाकारांच्या मागून डोळे मिटून चालण्याने हे रहस्य कोणा- सही लाभावयाचे नाही. तसे होण्यास अगदी स्वतंत्र आणि याहून अधिक चांगल्या अशा मार्गाचा अवलंब करावयास पाहिजे. मला असा मार्ग सद्गुरु- कृपेनें लाभला. अशा रीतीने उपनिषदांचा अभ्यास केल्यावरही संहिता परस्परविरोधी नाही अशी माझी खात्री झाली. याकरितां उपनिषदांचे रहस्य हस्तगत होण्यास त्यांतील वचनांची ओढाताण करण्याचे प्रयोजन मुळीच नाही. मूळ संहिता अत्यंत सुंदर आणि अत्यंत चित्ताकर्षक असून तीत पर- स्परविरोध कोठेही नाही. तींत विरोध नाही एवढेच नव्हे, तर तींत विल- क्षण सामरस्य आहे. कल्पना अनेक, पण त्या परस्परांस विरोध करीत नसून परस्परांस पोषक मात्र होतात. एकीहून एक चढती अशा कल्पनांची श्रेणी