पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप..१६९


नांव आम्हांस अधिक साजतें असेंही तुम्हांस आढळून येईल. आमच्या आचारावरून आमच्या धर्मपरायणतेचे प्रमाण काढावयाचे म्हटले तर नव्वद किंवा अधिक टक्के आम्ही पौराणिक असून बाकीच्या उरलेल्या अंशांनी आम्ही वैदिक आहों. त्याचप्रमाणे परस्परविरोधी अशाही अनेक चाली आमच्या आचारांत शिरून बसल्या असल्याचे तुम्हांस आढळून येईल. त्याचप्रमाणे ज्यांना श्रुतिग्रंथांत यत्किंचितही आधार आढळावयाचा नाही, असली मतें- सुद्धां धर्म म्हणून उघड्या माथ्याने आमच्या समाजांत धुडगुस घालीत अस. ल्याचे तुह्मांस दिसेल. त्याच प्रमाणे देशाच्या आणि परिस्थितीच्या अनुरोधाने कोठे कोठे अशा विलक्षण चाली आढळतात, की त्यांना श्रुतींचाच नव्हे तर स्मृतींचा अथवा पुराणांचाही आधार नसतो हे पाहून आपणास मोठे नवल वाटते; पण अशा चालींचें माहात्म्य त्या त्या विशिष्ट स्थलापुरतेच असते, हेही ध्यानात आणले पाहिजे. या चाली वेदबाह्य असल्या तरी अज्ञ लोकांच्या चित्तावर त्याचा पगडा इतका बसलेला असतो की, त्या नाहीशा झाल्या तर धर्म बुडून आपलें हिंदुत्वसुद्धा नष्ट होईल अशी भीति त्यांस वाटते. वेदान्त- धर्म आणि त्याच्या चालीरीती यांची पक्की गांठ त्याने आपल्या चित्तांत मारलेली असते, आणि ही गांठ सुटण्यासारखी आहे असे त्याला कधी चुकून- सुद्धा वाटत नाही. धर्मग्रंथ तो वाचतो त्या वेळी आपल्या चाली शास्त्रसंमत नाहीत हेही त्याला कळत नाही. या चाली सोडून दिल्या तर आपली धर्म- हानी काही होणार नाही आणि उलटपक्षी आपले हित होईल, ही गोष्टही त्याच्या लक्षात येत नाही. सामान्य जनसमूह इतका अज्ञ राहण्याचे आणखीही एक कारण आहे. आमचे धार्मिक वाड्मय सागराप्रमाणे अफाट आहे. एकट्या सामवेदालाच एक हजार शाखा होत्या, असें भगवान् पतंजलि यांनी आपल्या महाभाष्यांत म्हटले आहे. या सर्व शाखांचे काय झाले हे आज कोणासही ठाऊक नाही. हीच गोष्ट इतर वेदांसही लागू आहे. त्यांचा पुष्कळसा भाग नष्ट झाला आहे, आणि आतां आमच्या हातीं अल्पसा भाग मात्र राहिला आहे. हे भाग काही विशिष्ट कुलांच्या हाती होते. कदाचित् ही कुलें कालां- तराने नष्ट झाली असावी, परकीयांच्या स्वा-यात मारली गेली असावी अथवा दुसऱ्या काही कारणांनी स्मृतिगत झाली असावी; आणि त्यांजबरोबर त्यांच्या हाती असलेल्या श्रुतिशाखाही नष्ट झाल्या असाव्या. श्रुतिबाह्य अशी एखादी