पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १६५


शोधावयाची म्हटले, तर ती एकाच मुद्यावर होते असे आपणास आढळून येईल. हिंदुधर्मात अनेक शाखा आणि पंथ यांचे वास्तव्य असले, तरी त्या सर्वांस वेद ग्रंथ प्रमाण आहेत. श्रुतींची पूज्यता सर्वांस सारखीच मान्य आहे. यामुळे श्रुतिग्रंथ हा सर्वांचा सामान्य पाया आहे असे म्हणण्यास हरकत नाही. ‘फार काय, पण जो श्रुतींचे प्रामाण्य मानीत नाही, त्याला स्वतःस हिंदु म्हण विण्याचा अधिकार नाही असेही म्हणता येईल. या श्रुतींचे मुख्य भाग दोन आहेत, हे आपणांस बहुधा अवगत असेलच. या दोन भागांस कर्मकांड आणि ज्ञानकांड अशी नावे आहेत. यज्ञयागादि क्रियाकलाप, हव्यकव्य इत्यादिकांचें विवरण कर्मकांडांत आहेत. सांप्रतकाळी कर्मकांड बहुतांशी प्रचारांतून गेलें आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. उपनिषग्रंथ आणि वेदान्त यांचा अंतर्भाव ज्ञानकांडात होत असून त्यांत आमच्या धर्मतत्त्वांचे विवरण केलें आहे. हा भाग सर्व प्रकारच्या मतवाद्यांस मान्य आहे. द्वैती, विशिष्टाद्वैती आणि अद्वैती या सर्वांस आणि सर्व पंथांच्या तत्त्वज्ञास हा भाग सारखाच मानार्ह वाटत असून स्वमताच्या पुष्टीकरणास याच ज्ञानकांडाचा आधार ते वारंवार घेत असतात. निरनिराळ्या मतांचे तंटे तोडण्याचे अखेरचे आणि अत्युच्च दर्जाचे न्यायमंदिर ज्ञानकांड हेंच होय. कोणत्याही मताचें विवरण तुम्हांस करावयाचे असेल, तर त्याला ज्ञानकांडाचा आधार आहे हे तुम्हांस प्रथम दाखवावे लागते. ते तुम्हांस करतां न आले तर तुमचें सारें पांडित्य फुकट जाऊन तुमचे मत वेदबाह्य आणि अग्राह्य ठरते. याकरतां हिंदुधर्मातील सर्व मतांचा, पंथांचा आणि शाखोपशाखांचा अंतर्भाव एकाच नांवांत तुम्हांस करावयाचा असेल, तर तें कार्य वेदान्ती अथवा वैदिक अशा त‌‌-हेच्या एखाद्या नांवाने तुम्हांस करता येईल. वेदान्तधर्म अथवा वेदान्त या नांवाचा उपयोग जेव्हा जेव्हा मी करतो, तेव्हां याच अर्थाने तो शब्द मी योजीत असतो. केवळ अद्वैत मताचा निदर्शक या अर्थाने वेदान्त या शब्दाचा उपयोग करण्याची चाल सांप्रत पडली आहे; याकरितां माझ्या म्हण ग्याचे थोडें अधिक स्पष्टीकरण करणे येथें भाग आहे, उपनिषद्ग्रंग्रथांच्या मूळ पायावर ज्या अनेक मतांची उभारणी झाली आहे, त्यांपैकीच अद्वैत हेही एक मत आहे हे आपणा सर्वांस विदित आहेच. उपनिषदवृक्षाला ज्या अनेक शाखा पुढे फुटल्या, त्यांतीलच अद्वैत ही एक शाखा आहे; पण शाखा