पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] भक्ति. १५५


ईश्वराच्या लेकरांसही हाच नियम लागू आहे. परमेश्वर शिक्षा करणारा न्यायाधीश आहे की बक्षिसें वाटणारा दाता आहे, याची चौकशी ती कधीच करीत नाहीत. ज्यांना प्रेमाची गोडी कधीच कळलेली नाहीं असली माणसे मात्र परमेश्वराला मितात आणि त्याजपुढे वळचळां कांपतात. जे लोक अग. दींच रानटी अवस्थेत असतील त्यांना परमेश्वराच्या न्यायाधिशत्वाची ही कल्पना उपयोगी पडत असेल. ज्यांच्या ठिकाणी कोमल भावना जागृत झालेल्या नाहीत, त्यांनी अधिक क्रौर्याची कृत्ये करूं नयेत म्हणून असला पर- मेश्वराचा बागुलबोवा त्यांस दाखविणे उचित असेल; पण तुमच्यासारख्या संस्कृत माणसांस ही कल्पना आतां शोभत नाही. या कल्पना परमेश्वरास हीनत्व आणणान्या आणि तुम्हांस दुर्बल करणा-या आहेत. त्या तुमच्या उप- योगी नाहीत. जड कल्पनांचा त्याग तुम्ही केला आहे. खन्या धर्माच्या मार्गात तुम्हीं आतां पाऊल ठेवले आहे. तुमची सूक्ष्मेंद्रिये जागृत झाली आहेत. तुमची ज्ञानदृष्टि उघडली आहे. आता या पोरकट कल्पना तुम्हांस कशा शोभतील? ज्ञानवंत आहेत ते असल्या कल्पनांना आपल्या चित्तांत कधीही थारा देत नाहीत.
 प्रेमाची तिसरी कसोटी याहूनही अधिक उच्च आहे. प्रेम अथवा भक्ति हैं अत्युच्च ध्येय आहे. पहिल्या दोन पाय-या चढून जो वर गेला असेल त्या- लाच भक्तीची खरी किंमत कळेल. वाणसवदा आणि भीति ही दोन्ही मागे टाकून जो पुढे गेला असेल तो खरा भक्त होय. भक्ति हेच भक्तिमार्गाचें अंतिम ध्येय आहे, ही गोष्ट अशा भक्तांवांचून दुसऱ्या कोणासही पटावयाची नाही. एखाद्या तरुण रूपवतीचे प्रेम एखाद्या कुबड्यावर बसल्याची कितीतरी उदाहरणे या जगांत आपल्या पाहण्यांत येतात. मदनाचें प्रेम कुब्जेवर बस- ल्याची उदाहरणेही थोडी नाहीत. या प्रेमाचे बीज काय ? परस्परविरुद्ध अशा या दोन टोकांस कोणता तंतु जोडतो? त्या स्त्रीचा अथवा पुरुषाचा कुरुप- पणा मात्र व्ययस्थाच्या डोळ्यांना दिसत असतो. पण त्या प्रेमी मनुष्यांना ही दृष्टीच नसते. त्यांचे प्रेमविषय त्यांना तेमदनासारखे दिसत असतात. याचे कारण हेच की आपल्या प्रेमाच्या परिसीमेचें जे चित्र स्वतःच्या चित्तपटावर त्यांनी रंगविलेले असते, तेच त्यांना समोर दिसत असते आणि त्याजवरच त्यांचे प्रेम जडलेले असते. आपला प्रेमविषय कुरूप आहे हे त्यांच्या डोळ्यांस