पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] भक्ति.१५३


पुत्रपौत्रादि संतति दे. माझ्या राज्याची आणखी पुष्कळ वाढ होऊन सर्व प्रकारे माझी भरभराट व्हावी अशी मी तुझी प्रार्थना करतो." राजाची प्रार्थना अशा रीतीने इकडे चालली आहे इतक्यांत तो साधु पुरुष उठला आणि त्या दिवाणखान्याच्या दरवाजाकडे चालला. राजाने ते पाहिले आणि घाईघाईने त्याच्या पाठोपाठ जाऊन त्याला म्हटले, “महाराज, माझें दान घेतल्याशिवाय आपण कोठे चाललां ?" राजाकडे वळून साधूने म्हटलें, 'अरे भिकाऱ्या, मी भिकान्यांपासून दान घेत नसतो. तूं स्वतःच भिकारी तो तूं मला देणार काय आणि तुजपासून घ्यावे काय ? मला अमुक दे आणि तमुक दे अशी भीक परमेश्वराजवळ तूं आतांच मागत होतास."भक्तिपूर्वक केलेल्या प्रार्थनेची भाषा अशी नसते. आपणाला अमुक द्यावे आणि तमुक द्यावें अशी याचना परमेश्वराजवळ तुम्ही करूं लागला तर तुमच्या भक्तींत आणि बाजारांतील खरेदीविक्रीत भेद तो काय राहिला ? भक्तीची पहिली कसोटी हीच की तिला असला वाणसबदा ठाऊक नसतो. ती अत्यंत निर. पेक्ष असते. भक्ति ही नेहमी देणारी असते; घेणारी नसते. तिचे स्थान यजमानाचे आहे; याचकाचे नव्हे. खरा भक्त म्हणतो, “परमेश्वरा, हवें असल्यास माझे सर्वस्व तूं घे. मी तें तुला आनंदाने अर्पण करतो. मला हवी अशी एकही वस्तु या साऱ्या विश्वांत नाही. तुजपासून कसल्याही वस्तूची अपेक्षा मी करीत नाही. तूंच मला हवासा वाटतोस म्हणून मी तुजवर प्रेम करतो. तुझ्यापासून कशाचीही अपेक्षा मी करीत नाही, परमेश्वर सर्व- सामर्थ्यवान् असो अगर नसो, मला त्याच्या सामर्थ्याशी काय करावयाचे आहे ? त्याच्या सामर्थ्याचा काहीच उपयोग मला करून घ्यावयाचा नाही. अथवा मला स्वतःही सामर्थ्यवान् होण्याची इच्छा नाही. तो प्रेमाचा सागर आहे इतकेंच मी जाणतो; आणि यापलीकडे त्याचे दुसरे कोणते गुण आहेत हे जाणण्याची इच्छा मला नाही."
 खऱ्या भक्तीची दुसरी कसोटी ही की तिला भीति ही भावना ठाऊक नसते. एका हातांत बक्षीस आणि दुसन्यांत चाबुक घेऊन परमेश्वर ढगांच्या पलीकडे बसला आहे, अशी परमेश्वरविषयक भावना तुमच्या चित्तांत असेल, तोपर्यंत खऱ्या भक्तीचा उदय तुमच्या अंतःकरणांत होणे शक्य नाही. आपण अमुक रीतीने वागलों अथवा अमुक रीतीनें न वागलों तर परमेश्वर आपणास