पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


केलेली नव्हे हे उघड झाले. ही परमेश्वराची भक्ति नव्हे, हिला भक्ति हैं सोज्वल नांव द्यावें तरी कसे ? तुमची प्रार्थना मी करतो आणि मजवर प्रसन्न होऊन एखादी वस्तु तुम्ही मला देता. तुमची प्रार्थना मी प्रेमामुळे केली असें या स्थितीत म्हणता येईल काय? हा फक्त तुमचा आमचा व्यापार झाला. खरा भक्त म्हणतो, "राजी हैं हम उसीमें जिसमें तेरी रजा है।" परमेश्वरा, तूं ज्या स्थितीत मला ठेवशील तींत मी राजी आहे. दुःखसागरांत तूं मला लोटलेंस तर त्या सागराच्या लाटांबरोबर मी वाहात जाईन. हात देऊन तूं मला वर काढलेंस तर मी वर निघेन. पण दोन्ही वेळां हेंच म्हणेन की " राजी हैं हम उसीमें जिसमें तेरी रजा है."
 पूर्वी एका काळी एक राजा अरण्यांत शिकारीस गेला असतां एक साधु पुरुष त्याला भेटला. त्या सत्पुरुषाशी थोडा वेळ राजाचे भाषण झाले, तेव्हां राजाला फार संतोष होऊन त्या साधूला कांही देणगी द्यावी असा विचार त्याच्या मनांत आला, आणि आपणापासून काही वस्तु दान घेण्याबद्दल त्याची विनंति त्याने केली. तेव्हां साधु म्हणाला, राजा, तुजपासून कस- लीही वस्तु घेण्याची माझी इच्छा नाही. माझी जी सध्याची स्थिति आहे तीत मी फार संतुष्ट आहे. हे आजूबाजूचे वृक्ष मला खाण्यापुरती फळे देतात आणि हे शुद्धोदकाचे झरे माझी तहान भागवून मला तृप्त करतात. तूं मोठा चक्रवर्ती राजा असलास तरी तुझ्यापासून कोणत्या वस्तूची अपेक्षा मला असणार ?" राजाने उत्तर दिले " महाराज, मला संतोष व्हावा म्हणून आणि माझें पापक्षालन व्हावे म्हणून तुम्ही मजपासून काही तरी ग्रहण क- रावें. आपण मजबरोबर राजधानीस याल तर मजवर मोठा अनुग्रह होईल." राजाने याप्रमाणे फारच आग्रह केला; तेव्हां अखेरीस तो साधु राजाबरो- बर त्याच्या शहरी जावयास सिद्ध झाला. राजाबरोबर तो राजमहालांत गेला. त्या ठिकाणीं सोने, हिरे, माणकें, मोती इत्यादि रत्नांच्या वस्तूंचा मोठा संग्रह होता. राजाचें ऐश्वर्य आणि त्याची सत्ता व सामर्थ्य यांचे प्रद- र्शन जागोजाग स्पष्टपणे दृग्गोचर होत होते. साधूला एका सुंदर आसनावर बसवून राजा म्हणाला, “ साधुवर्या, मी थोडा वेळ प्रार्थना करतों तोपर्यंत कृपा करून आपण या आसनावर बसावें" इतकें बोलून आणि जरा बाजूला होऊन राजा प्रार्थना करूं लागला. "परमेश्वरा, मला अधिक दौलत दे, मला