पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] भक्ति. १४३


उद्भवतो तेव्हां तेव्हां नाम अथवा शब्द आणि रूप अथवा आकार यांच्याच द्वारे त्यांचे जनन झालेले असते. यांपैकी एक जेथे असेल तेथें दुसरेही असा- वयाचेच. जेथें एक जाईल तेथे ते दुसऱ्याला बरोबर घेऊनच जाईल. विचार शब्दाला आणतो आणि शब्द विचाराला प्रसवतो. अशा रीतीने सारे विश्व ही परमेश्वराची एक प्रतिमाच आहे, आणि त्या प्रतिमेच्या मागे त्याचें नाम उभे आहे. प्रत्येक विशिष्ट देह हे एक रूप अथवा आकार असून त्यामागे त्याचे विशिष्ट नाम असते. 'माझा मित्र राजश्री अमुक' असा विचार तुमच्या मनांत येण्याबरोबर तेथे त्याच्या देहाची प्रतिमा ताबडतोब उभी राहते, आणि उलटपक्षी तुमच्या मित्राची देहयष्टि तुम्हांस आठवते तेव्हां त्याच्या नामाचे स्मरणही तुम्हांस होते. मनुष्यस्वभावांतच या गोष्टी आहेत. त्या टाकावयाच्या म्हटले तर आपला सारा स्वभावच टाकून दिला पाहिजे. ज्या घटकांचा एखादा पदार्थ बनलेला असतो त्यांतील एखादा घटक काढून टाकावयाचा म्हटले तर तो पदार्थही त्याबरोबर नाहीसा होऊन दुसरा एखादा पदार्थ त्या जागी येईल. त्याचप्रमाणे ज्या घटकांचा मनुष्यस्वभाव बनला आहे त्यांतील एखादाही काढून टाकणे आपणास शक्य नाही. सूक्ष्मेंद्रिय शास्त्राचे म्हणणेही हेच आहे. नामावांचून रूपाची कल्पना करणे अथवा रूपावांचून नुसत्या नामाची कल्पना करणे मानवी मनास शक्य नाही असे सूक्ष्मेंद्रियशास्त्रही सांगते. नाम आणि रूप ही एकमेकांशी इतकी जखडली आहेत की कोणत्याही उपायांनी आपणांस ती एकमेकांपासून विभक्त करता येणे शक्य नाही. लाटेच्या आंतील आणि बाहेरील असे दोन भाग मिळून ज्याप्रमाणे एक लाट बनते, त्याचप्रमाणे नाम आणि रूप ही एकाच वस्तूची दोन अंगें होत. यामुळेच नामाला एवढे महत्व सा-या जग- भर प्राप्त झाले आहे. अजाणपणे अथवा जाणून बुजून नामाचे हे महत्व मनु- प्याच्या लक्ष्यात आले आहे.
 याच बाबींत आणखीही एक मुद्दा लक्ष्यात घेण्यासारखा आहे. जगांतील अ- नेक वेगवेगळ्या धर्मात माहात्म्यांची पूजा करण्याची चाल आहे.कोठे कृष्णाची, तर कोठे बुद्धाची आणि कोठे ख्रिस्ताची, याप्रमाणे साऱ्या जगभर ह्या पूजनाचा हा प्रकार आढळून येतो. याशिवाय साधु पुरुषांची पूजा होते ती वेगळीच.

असे शेंकडों सत्पुरुष आज जगभर आहेत आणि त्यांचे पूजनही होत आहे.