पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४२. स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


द्योतक आहे. या गोष्टी आतां मागे टाकून आपण पुढे सरले पाहिजे. आपल्या बापदाद्यांचा धर्म म्हणून हव्या त्या खुळाला मिठी मारून बसणे आपणांस योग्य नव्हे. केवळ आपल्या राष्ट्राचा धर्म, अथवा कुळाचा धर्म म्हणून विचारशून्य बनून कसल्याही कल्पना आणि विधिविधाने यांस चिक- टणे आपणांस शोभत नाही. या सान्यांना लांब झुगारून देऊन त्यांच्या हद्दीपलीकडे आपण गेले पाहिजे. अखिल मानवकुल हे एकरूप अस्तित्व असून ते हळूहळू प्रकाशाकडे येत आहे. मानवकुलरूपी हे रोप हळूहळू वाढत असून त्याला नव्या नव्या ढि-या फुटत आहेत. परमेश्वर या नांवानें ओळखले जाणारे जे सत्यरूप त्याच्या संनिध मानवकुल हळू हळू जात आहे. या प्रवासांतला अगदी पहिला मुक्काम विधिविधाने हाच होय. जडरूपांतूनच चैतन्याचा मार्ग जात असतो.
 ईशपूजनाचे अनेक प्रकार, होमहवनादि गोष्टी अथवा इतर बाह्योपचार यांचे अवलोकन सूक्ष्म दृष्टया आपण केले तर त्यांच्या पोटी एक तत्त्व आ- पणास आढळून येईल. त्यांच्या पोटीं जे नाम आहे, त्यासाठी हे सारे प्रकार असतात. जुन्या काळचा ख्रिस्ती धर्म पहा, अथवा जगांतील दुसरे कोणतेही जुने धर्म पहा, त्यांत नाममाहात्म्यच मुख्यतः आढळून येईल. एखाद्या नामाच्या मध्यबिंदूभोंवतीं बाह्योपचारादि सारी मंडळी गोळा झा- लेली असते. सर्व धर्मानी नाम हे अत्यंत पवित्र मानलेले आहे. परमे- श्वराचें नाम हे सर्व पवित्र वस्तूंहून अधिक पवित्र आणि अनुपम्य आहे असे बायबलांतही म्हटले असल्याचे तुम्हांस ठाऊक असेलच. फार काय, पण परमेश्वर हा नुसता शब्दसुद्धा अत्यंत पवित्र समजला आहे. येथे सूक्ष्म भावना आणि जड शब्द ही पावित्र्याच्या दृष्टीने एकरूप झाली आहेत. शब्द हाच परमेश्वर, असें नव्या करारांतील एक वचन आहे; आणि असें असणे हे अगदी योग्य आहे. विश्व हे तरी नाम आणि आकारच नव्हे काय? शब्दाचा अभाव झाला, तर आपल्या विचारशक्तीचीही इतिश्री होईल. शब्दावाचून विचार करणे आपणांस शक्य आहे काय, याचा अनुभव तुम्ही स्वतःशीच घेऊन पहा. विचार आणि शब्द ही अभेद्य आहेत. त्यांना वेगळे करणे शक्य आहे असें तुम्हांपैकी कोणास वाटत असेल, तर तसें करण्याचा यत्न करून पहा. जेव्हा जेव्हां कसलाही विचार तुमच्या चित्तांत