पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड]भक्ति.१३९ {{rule}

समजतात. या ठिकाणी तें चर्च हे पवित्रतेचें जड चिन्ह आहे हे कोणाच्याही लक्ष्यांत येईल. त्याचप्रमाणे नव्या कराराचे पुस्तकही अत्यंत पूज्य समजलें जाते. एकंदरीने तात्पर्यार्थ इतकाच की जड चिन्हें समूळ नाहीशी करणे आपणांस शक्य नाही. यासंबंधाने कितीही ओरड आपण केली तरी ती अरण्यरुदनवत् होणार यांत संशय नाही; आणि वास्तविक पाहतां अशी ओरड तरी आपण कां करावी ? अशा प्रकारच्या चिन्हांचा उपयोग कर- ण्यास हरकत कोणती? त्यांविरुद्ध एवढा गिल्ला करण्याचे कारण मला तरी काही दिसत नाही. नुसत्या चिन्हांना काही महत्व नाही हे खरे, पण ज्या सत्य वस्तूची ती दर्शक आहेत, त्या महत्वाच्या नाहीत असें कोण म्हणेल ? फार काय, पण हे सारे विश्व हेही एक चिन्हच आहे, आणि त्याच्या पाठी- मागे जी सत्य वस्तु आहे तिचें आकलन करण्याचा यत्न त्याच्याद्वारे आपण करीत आहो. जड वस्तु अथवा चिन्ह हे कांहीं आपलें साध्य नव्हे; तथापि ते साधन आहे आणि त्या साधनाच्याद्वारे चैतन्याला पोहोचण्याचा यत्न आपण करीत असतो. आकृती, मूर्ती, घंटा, धूपदीप, ग्रंथ, देवळे, चर्चे आणि इतर सारी चिन्हें ही पावित्र्याची द्योतक असल्यामुळे ती त्याज्य नव्हत. चैतन्याचे जे बीज आपण पेरले आहे त्याला जोमदार अंकूर फुटून त्याचा वृक्ष बनण्यास या सा-या गोष्टींची मदत आपणास होत असते; तथापि ही केवळ मदतीची साधने आहेत हेही विसरता उपयोगी नाही. नाही तर साधनेच साध्यरूप होऊन बसतात आणि आपल्या अखेरच्या फळाला आपण अंतरतो. अशा साधनांचा उपयोग लक्षावधि लोक करित असतात; आणि यांपैकी बहुतेकांची वाढ फारशी होत नाही हेही आपण पाहातो. अशा अनेक साधनांच्या समृद्धींत आपला अध्यात्मिक जन्म होतो हे वावगें नाहीं; पण त्या साधनांत असतांच मृत्यु यावा हे मात्र रास्त नाही. साधनांच्या मर्यादित भूमीत आपल्या कार्याला आरंभ व्हावा हे युक्त आहे, पण मरेपर्यंत जर ही साधनें टाकता आली नाहीत जर आपली वाढ झाली नाहीं हेच सिद्ध होत नाही काय ? मुलाने चालण्यास शिकावें म्हणून त्याला पांगुळगाडा देतात, पण जन्मभर त्याचा पांगुळगाडा जर सुटला नाही, तर त्याची बाल्यदशा संपली नाही असेच म्हणावे लागेल. गुराचे तोंड लागू नये आणि वाऱ्यावावटळीपासून इजा होऊ नये म्हणून रोपाच्या भोंवतीं कुंपण