पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड]भक्ति.१३७


कल्पना नाही आणि तेथे त्याचे पूजनही अर्थातच नाही; तथापि आपापल्या धर्मसंस्थापकांचे पूजन तेही करीत असतात; आणि त्यांच्या पूजनाचा प्र- कारही इतरांसारखाच आहे. मनुष्यमात्रावर प्रेम करणाऱ्या कोणातरी उच्च प्रतीच्या प्राण्याच्या भक्तीची कल्पना सर्व जगभर रूढ आहे. बौद्ध आणि जैन हे परमेश्वराचे अस्तित्व मानीत नसले, तरी आपल्या धर्मसंस्थापकांच्या ठिकाणी तितकीच पूज्यबुद्धि ठेवतात आणि इतर धर्मानुयायी जशी परमेश्व- राची भक्ति करतात, त्याचप्रमाणे ते आपापल्या धर्मसंस्थापकांची करीत असतात. नांवांत फरक असला, तरी मूळ भावनांचे स्वरूप तेंच आहे. जगांतील भिन्न भिन्न धर्मांच्या उपासकांच्या पायरीप्रमाणे व परिस्थितीप्रमाणे भक्तीचे प्रकार वेगवेगळे आढळून येतात. पूजनाचे होम हवनादि जड प्रकार हे भक्तीच्या कनिष्ठ रूपाचे द्योतक आहेत. ज्यांना परोक्ष तत्त्वांचे आकलन करण्याची पात्रता नसते त्यांच्यांत हे प्रकार विशेषेकरून रूढ असतात. बुद्धीला प्रगल्भता नसल्यामुळे सूक्ष्म तत्त्वांना जडरूप दिल्याशिवाय त्यांच्या आकलनांत ती येणे शक्यच नसते. सूक्ष्म तत्त्वांच्या उच्च वातावरणांत तरंग- ण्याची विद्या त्यांस पारखी असल्यामुळे त्या तत्त्वांना खाली ओढून स्वतःच्या पदवीस ते आणून बसवीत असतात. अशा स्थितींत बाह्य विधींचे स्तोम माजतें हैं रास्तच आहे. या बाह्यविधीतच नानाप्रकारच्या चिन्हांचा अंत- र्भाव होतो. जगाच्या प्राचीन काळच्या इतिहासांतही हा प्रकार आरंभापासून आढळून येतो. सूक्ष्म आणि परोक्ष तत्त्वांचे आकलन जड संज्ञांच्या द्वारें करण्याची धडपड मनुष्यप्राणी फार प्राचीन काळापासून करीत आला आहे. बाह्यविधी आणि चिन्हें यांची उत्पत्ति अशा प्रकारे झाली आहे. घंटानाद, संगीत, होमहवन, ग्रंथप्रतिमा वगैरे साऱ्या वस्तू याच प्रकारांत येतात. बाह्येंद्रियांना ज्यांचे आकलन करता येईल आणि ज्यांच्या द्वारें अमूर्त तत्त्वांचें आकलन करता येईल अशा कोणत्याही पदार्थाचे पूजन मनुष्यप्राणी करीत असतो.
 अशा प्रकारें जड पदार्थांचे पूजन करणे अयोग्य आहे असे म्हणणारा सुधारकवर्गही प्रत्येक धर्मात फार प्राचीन काळापासून निर्माण होत आला आहे. होमहवनादि क्रिया आणि प्रतिमापूजन या गोष्टी या वर्गाच्या मतें सर्वथैव त्याज्य दिसतात. तथापि अशा सुधारकांच्या प्रयत्नाला कधी काळी