पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३६स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


आपण वस्तुतः आणि स्वभावतः चैतन्यरूप आहों ही भावना त्याच अवस्थेत जागृत होत असते. त्या स्थितीत बाह्य जगाच्या मदतीची अपेक्षा आपल्या चित्तांत नसते. अगदी अंधारमय अशा एखाद्या गुहेत आपण बसलो असलों तरी आपला जीवात्मा आपल्याभोंवतीं प्रकाशाचा पूर उत्पन्न करीत असतो. नीचतम वस्तूही तेथे उज्ज्वल दिसतात. दुर्गध सुगंधमय होतो. सैतानही तेथें परमात्मरूप होतो. त्या ठिकाणीं क्रोधादि विकारांना जागा नाही. तेथे शत्रूचे मित्र होतात. 'मी आणि माझें' या शब्दांचे अर्थ आपण विसरून जातो. ध्यानाच्या वेळी शरिराच्या अस्तित्वाचा विचार होईल तितका कमी करीत जावा. मला देहच नाही ही भावना पक्की करण्याचा प्रयत्न होईल तितका करावा; कारण आपल्या साऱ्या अधःपतनाचें मूळ कारण देहच होय. देह म्हणजेच मी ही पहिली भावना आपल्या नाशाचें मूळ कारण होय. देहाच्या ठिकाणीं ममत्व उत्पन्न झाले की आपलें सारें सुख तेवढया साडे- तीन हातांत गोळा होऊन बसते. त्याच्या इच्छांची तृप्ति करणे हेच आपलें कर्तव्य आहे असे वाटू लागते, आणि मग आपली सारी धडपड केवळ त्याच हेतूने सुरू असते. त्यांत तृप्ति सांपडली नाही की आपली जीवितयात्रा कष्ट- मय होते. याकरिता 'मी देह' असें वाटणे हीच आपली पहिली चूक होय. आपल्या साऱ्या दुःखाचे रहस्य हेच. 'मी देह' ही भावना टाकून 'मी चैतन्य' ही भावना उत्पन्न करणे हे आणि सुखदुःखमिश्रित विश्व केवळ पडद्यावरील चित्रांसारखे आहे हे जाणणे हीच आत्मानुभवाची गुरुकिल्ली आहे. 'सारे विश्व पडद्यावर रंगविले असून मी त्याचा साक्षी आहे' असा अनुभव येणे हेच आपलें अखेरचें साध्य.

--
भक्ति.

 काही थोडे धर्म वगळले असतां बाकीच्या धर्मात व्यक्तिविशिष्ट परमेश्व- राची कल्पना आढळून येते. बौद्ध आणि जैन या धर्माशिवाय जगातील बाकीच्या साऱ्या धर्मात ही कल्पना आहे, आणि तीबरोबरच भक्ति आणि पूजन या कल्पनांचाही उगम आहे. बौद्ध आणि जैन या धर्मात परमेश्वराची