पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड.]अभ्यास.१३५


 तुम्हांस योगी व्हावयाचे असेल, तर तुमची वृत्ति अत्यंत मोकळी असली पाहिजे. आशेच्या शृंखलेत तुमचे पाय गुंतलेले असूं नयेत. स्वातंत्र्याची आणि चित्ताला काळजी उत्पन्न न करणारी अशी आपली दिनचर्या असावी. आपल्यामागे कसल्याही उपाधी लावून घेऊ नये. योगाभ्यासाला ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. आपल्या सा-या चैनी व्यवस्थितपणे चालल्या पाहि- जेत आणि त्याबरोबरच आत्मानुभवही झाला पाहिजे अशी इच्छा करणारा मनुष्य अत्यंत मूर्ख होय. नदीपलीकडे जावें या इच्छेनें कोणा एका मनु- ध्याने सुसरीच्या पाठीवर स्वारी केली अशी एक गोष्ट आहे. या मनुष्याचें शाहाणपण आणि संसारांतील चैनी भोगतां भोगतां आत्मानुभवाची वाट चोखाळू पाहणारा, शाहाणपण ही एकाच किंमतीची आहेत. "प्रथम परमे- श्वराच्या राज्याचा शोध करा; म्हणजे बाकीच्या सर्व वस्तू तुम्हांस मिळ- तील," अशी येशू ख्रिस्ताचीही आज्ञा आहे. आपलें आदि कर्तव्य हेच आहे. त्याग याचा अर्थ हाच, जगावयाचे ते केवळ आपल्या ध्येयाच्या सिद्धीसाठी. दुसऱ्या कोणत्याही भावना चित्तांत उरू द्यावयाच्या नाहीत अशा पद्धतीची वागणूक आपण ठेवली पाहिजे. आपल्या ध्येयाशिवाय दुसऱ्या कोणत्याही विचारास आपल्या चित्तांत स्थळ मिळू नये. आपले आध्यात्मिक साम्राज्य मिळवावें यासाठीच आपण सारी धडपड करावी. ऐहिक वस्तु आणि सुखें ही सारी नाशवंत आहेत हे आपण प्रत्यही पाहत आहों. यासाठी चिरंतन स्वरूपाचे जे काही असेल आणि जे एकवार प्राप्त झाल्यानंतर आपणापासून निघून जाणार नाहीं तें मिळविण्याची खटपट करणे हेच आपलें पहिले कर्तव्य आहे. आत्मानुभव व्हावा अशी खरी तळमळ आपल्या चित्तास लागली असेल, तर त्यासाठी एकसारखी धडपड केल्यावांचून आपणास गत्यंतर नाहीं; आणि अशा प्रकारची धडपड हीच आपल्या वाढीस कारण होईल. इच्छा नसेल तर धडपडही नाही आणि धडपडीच्या अभावी वाढही नाही. अशी धडपड करीत असतां अनेक प्रकारच्या चुका आपण कदाचित् करूं; पण त्या चुकाच आपल्या कल्याणास कारण होणार नाहीत अस तरी कोणी म्हणावें?
 आत्मानुभवाच्या मार्गात आपला पहिला मोठा मदतगार ध्यान हा होय.

यानावस्थेत आपल्या भोवतालचे जड विश्व आपण विसरून गेलेले असतो.