पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३४स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


बिकट अशी आहे. दिवा लावण्यास पुरता एक क्षणही लागत नाही. काडी ओढली की ताबडतोब मेणबत्ती पेटून जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होतो; पण मूळ मेणबत्ती तयार करण्यास केवढा काळ लागतो याचा विचार करा. जेवण जेवण्यास फार तर अर्धा तास लागेल; पण ते तयार करण्यास किती वेळ लागतो! मेणबत्ती पेटून क्षणार्धात प्रकाश व्हावा अशी आपली इच्छा आहे; पण मेणबत्ती तयार झाल्याशिवाय ती पेटणार कशी हा विचार मात्र आपण कधीच करीत नाही. ती तयार करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.
 या अखेरच्या पायरीवर जाऊन बसणे हे काम अत्यंत दुर्घट आहे हे खरें; तथापि या कार्यासाठी अल्पही परिश्रम आपण केले तरी ते फुकट जात नाहीत. आपले परिश्रम पुष्कळ झाले तर महत्कार्य साधेल आणि ते थोडे झाले तर कार्यही थोडें होईल; पण ते अगदीच वायां गेलें असें मात्र कधीच घडणार नाही. कशाचाही पूर्ण नाश होत नाही हे अर्वाचीन शास्त्रांचें एक तत्त्व आपणास ठाऊक आहेच. भगवान् श्रीकृष्ण यांस अर्जुन प्रश्न करतोः “ अयतिः श्रद्धयोपेतो योगाचलितमानलः । अप्राप्य योगसंसिद्धिं कां गति कृष्ण गच्छति ॥ कच्चिनोभयविभ्रष्टः च्छिन्नानामिव नश्यति" याः प्रश्नाचे उत्तर भगवान् देतातः 'पार्थ नैवेह नानुन विनाशस्तस्य विद्यते । नहि कल्याणकृत् कश्चिदुर्गति तात गच्छति ॥' या जन्मी योगसिद्धीची प्राप्ति तुम्हांस न झाली तर पुढील जन्मी तोच अभ्यास पुढे चालवून ती सिद्धि तुम्ही मिळवाल. असे होत नसेल तर येशु, बुद्ध, श्रीशंकराचार्य यांच्या लोकातीत बाल्यावस्थेची संगति तुम्ही कशी लावतां ? बालवयांत जी का-ये कोणाच्या स्वप्नीही यावयाची नाहीत, ती त्यांनी प्रत्यक्ष करून दाखविली हे कसे घडलें?
 प्राणायाम, आसन इत्यादि क्रियांची मदत योगाभ्यासांत फार होते यांत संशय नाहीं; तथापि त्या केवळ जड देहाच्या बाह्य क्रिया होत हेही लक्ष्यांत ठेवले पाहिजे. खरा अभ्यास मानसिक आहे. तयारी करावयाची ती जड देहाची नसून मनाची करावयाची. याकरिता आपल्या आजूबाजूची परि- स्थिति आपणास अनुकूल अशी असली पाहिजे. आपल्या चित्ताला शांति असावी. अनेक प्रकारच्या व्यवसायांनी तें व्यग्र असू नये. चित्ताला हांव फार असली म्हणजे तें रजोगुणी होऊन इतस्ततः भटकू लागते आणि तें

केव्हांच शांत राहत नाहीं; अशी मानसिक अवस्था योगाला प्रतिकूल आहे.