पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड]अभ्यास.१३३


जाणिवेच्या हद्दीबाहेरील विचारांचे आक्रमण करणे हे अभ्यासयोगाच्या कार्यक्रमांतील पहिले कलम आहे. यानंतर विचारातीत होण्यास आपण योग्य होतो. ज्याप्रमाणे आपोआप घडणाऱ्या क्रिया आपल्या विचाराक्षम स्थितीत घडून येतात, त्याचप्रमाणे दुसरी कित्येक कार्ये विचारातीत स्थिती- तील आहेत. या विचारातीत स्थितीपर्यंत आपण पोहोंचलों म्हणजे आपण मुक्तावस्थेला पोहोचतों-नराचे आपण नारायण बनतो. मृत्यूचे रूपांतर चिरजीवितांत होतें; दुबळेपणाच्या जागी सर्वशक्तिमत्त्व येते आणि शृंखला गळून जाऊन आपले पाय मोकळे होतात. विचारातीत स्थितीचे ध्येय हे आहे. या स्थितीच्या साम्राज्याचा विस्तार अनंत आहे.
 आपल्यापुढे असलेले कार्य दोन प्रकारचे आहे हे आतापर्यंत केलेल्या विवेचनावरून आपल्या ध्यानात आले असेलच. इडा आणि पिंगला यांच्या समतोल कार्याने आपल्या निद्रित विचारभांडारावर जय मिळविणे हे आपले पहिले कार्य आहे. इडा आणि पिंगला यांच्या कार्यक्षमतेवरच आपला रोजचा व्यवहार चालू आहे. यांचे कार्य आपल्या ओळखीचे आहे. या ओळखीच्या मार्गाने अनोळखीचा रस्ता शोधून काढणे हे आपले पहिल्या प्रकारचे कार्य आहे; आणि विचारातीत प्रांतांत प्रवेश करणे हे आपले दुसरें कार्य आहे.
 दीर्घकाळ अभ्यास करून ज्याला या सत्याची ओळख पटली असेल तोच खरा योगी होय असें योगशास्त्राचे म्हणणे आहे. आपणासारख्या सामान्य मनुष्यांस सुषुम्नेचा उपयोग कांहींच होत नाही. सामान्य मनुष्यांत तिचें द्वार बंद असते. योग्याच्या सुषुन्नेचे द्वार खुले होते आणि कुंडलिनीचा प्रवेश त्यांत होतो, आणि हळुहळु वर चढतां चढतां सहस्रदल कमलापर्यंत पोहोचते. ती मेंदूंत पोहोचली म्हणजे आपलें सत्यरूप काय आहे हे योग्याला समजतें. आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहों असा अनुभव त्याला येतो.
 योगसोपानाची ही अखेरची पायरी आहे. आपणांपैकी प्रत्येकास या पायरीवर आरूढ होणे शक्य आहे. ज्याला अशी योग्यता नाही असा एकही मनुष्य नाही. तथापि हे कार्य अत्यंत दुष्कर आहे अशी सूचना देणे मात्र अवश्य आहे. नुसती व्याख्याने ऐकून आणि पांच चार मिनिटें प्राणायाम करून हे कार्य सिद्ध होईल असा भलताच भ्रम कोणीही बाळगू नये. अखे- - रची सिद्धि प्राप्त होण्यासाठी करावी लागणारी आगाऊ तयारीच अत्यंत