पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड]अभ्यास.१३१


मी शिव्या देत असेन आणि कदाचित् त्याच्या दुर्गुणांचा मला उपयोगही होत असेल ! त्याचप्रमाणे एखाद्याला मी पूज्य मानीत असेन आणि त्याच्या चांगुलपणाचा फायदा मी घेत असेन. केवळ कल्पनावारूवर आरूढ होऊन हे मी काही तरी बोलत आहे असे आपण समजू नका. जी वस्तुस्थिति आहे तीच मी सांगत आहे. मी तुम्हांसमोर उभा आहे हे जितके खरे आहे, तितकाच आतां सांगितलेला सिद्धांतही खरा आहे. रस्तोरस्ती फिरणाऱ्या नगरभवानीची हेटाळणी केवळ लोकांच्या इच्छेस्तव मला करावी लागते, पण पातिव्रत्यरक्षणाच्या कामी किती स्त्रियांना तिने मदत केली आहे हा विचार माझ्या मनांत आला म्हणजे तिची योग्यता माझ्या मुक्तिदात्या गुरू- इतकी आहे असे माझ्या मनांत आल्यावांचून राहत नाही. आपण सर्वांनीच या गोष्टीचा विचार करणे अवश्य आहे. प्रिय मित्र हो, आपण मनांतल्या मनांत या गोष्टीचा खोल विचार करा. जे सत्य आहे ते जसेच्या तसेंच तुम्हांपुढे मी मांडले आहे. जो जो जगाचे अवलोकन मी अधिक करतो आणि अधिकाधिक स्त्रीपुरुष माझ्या निरीक्षणांत येतात, तो तो या सिद्धांताबद्दल माझी खात्री अधिक पटत जाते. अशा स्थितीत मी नांवे तरी कोणाला ठेवावी, आणि स्तुति कोणाची करावी? एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. नाणे पाहावयाचें म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू अवलोकनांत आणल्या पाहिजेत.
 आपणापुढे असलेले कार्य लहानसान नाही. त्याचा विस्तार फार मोठा आहे. तें साधण्यासाठी आपणास जें अत्यंत महत्वाचे कर्तव्य करावयाचें आहे ते हे की सुप्तावस्थेत असलेला जो प्रचंड विचारसमूह आपणापाशी आहे त्यावर ताबा मिळवावयाचा. आपले हे विचार सध्या आपल्या ताब्यांत नाहीत, यामुळे त्यांचे कार्यही आपल्या जाणिवेंत न येतां चालू असतें.
 एखाद्याने काहीं असत्कर्म केले तर ते अगदी आपोआप घडलेले नसून त्याच्या जाणिवेने घडलेले असते हे खरे; पण ज्या कारणामुळे तें असत्कृ- तीचे कार्य घडलें तें कारण जाणिवेच्या प्रांतापासून इतके लांबवर आणि खोल असतें की कर्त्याच्या दृष्टिपथांत तें केव्हांच येत नाही; आणि यामुळे त्याचा प्रतिकार करणेही त्याला अशक्य होते. त्या कारणाला केव्हांच प्रति- कार ठाऊक नसल्यामुळे ते फार बलिष्ठ होऊन बसले आहे आणि कर्त्याला

गुलाम बनवून आपला अंमल तें त्याजवर चालवीत असते.

.