पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३०स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


त्याला ओढून नेऊन बलात्काराने त्याजकडून चोरी करवीत असतात ! माझी ही उपपत्ति ऐकून तुमचा जीव कदाचित् दडपून गेला असेल; पण काय करावें? वस्तुस्थिति तशीच आहे. मानसशास्त्रांतील हे खरोखर एक मोठे कोडे आहे. मनुष्याच्या भलेबुरेपणाची कसोटी लावतांना आपले चित्त आ- पण उदार ठेवले पाहिजे. सर्व प्रकारे चांगले होणे हे आपणांस वाटते तितकें सोपे नाही. काही झाले तरी तुम्ही परिस्थितीचे गुलाम आहां. भोवतालच्या परिस्थितीची जाणीव कायम असतां आम्ही स्वतंत्र आहों असें म्हणणे हैं अशास्त्र आणि मूर्खपणाचे आहे. पूर्ण मुक्तावस्था प्राप्त होईपर्यंत आपली स्वतंत्रवुद्धीची बडबड व्यर्थ आहे. “सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवा- नपि।" हा सिद्धांत आपण नेहमी ध्यानात ठेवला पाहिजे. तुमचे चांगुल- पणसुद्धा तुमच्या प्रकृतीचे अंकित आहे. तुम्ही चांगले आहां याचे कारणही हेच की तसे असल्यावांचून तुम्हांस गत्यंतरच नाही. त्याचप्रमाणे जो वाईट आहे तोही असल्या प्रकृतीमुळेच आहे. त्याचे वाईटपण त्याला सहसा टाकतां येत नाही. त्याच्या परिस्थितीत तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते हे कोणी सांगावें ? रस्त्यांत भटकणारी भिकारीण आणि तुरुंगांत पडलेला चोर यांचे बळी तुमच्या कल्याणाकरितां पडले आहेत. चांगले असें नांव तुम्हांला प्राप्त व्हावे म्हणून ती स्त्री भिकारीण झाली आणि तो मनुष्य तुरुंगांत गेला. विश्वाच्या समतोलपणाचा कायदा अशा प्रकारचा आहे. जगांतील सारे चोर, खुनी, अन्यायी, दुवळे, दुष्ट आणि सैतानी लोक हे माझे उद्धारकर्ते गुरू आहेत. या साऱ्यांचे पूजन करावें हेच मला उचित आहे. ज्याप्रमाणे दैवी संपत्ति- वानाला मी नमन करणे योग्य, त्याचप्रमाणे आसुरी संपत्तिवानालाही मला नमन केले पाहिजे! मित्र हो, माझी ही मते ऐकून तुम्हांला मोठे नवल वाटेल, पण मी तरी काय करूं ? माझ्या डोक्यांत असेच विचार येतात आणि ते बंद करणे अथवा त्यांची दिशा बदलणे मला शक्य नाही. ज्याप्रमाणे सद्गुणी भगवद्भक्तांना मी नमन करतो, त्याचप्रमाणे अत्यंत दुर्गुणी सैतानालाही मी नमन करतो. ते सारेच माझे गुरू आहेत. ते सारेच मला ज्ञानदात्या वडिलां- समान पूज्य आहेत. ते सारेच माझे तारक आहेत. इतर स्त्रिया शुद्ध आणि पवित्र कां ? रस्त्याने डोळे मोडीत फिरणारी नगरभवानी अस्तित्वात आहे म्हणून. लोक तिला हंसतात म्हणून मीही तिला हंसले पाहिजे! एखाद्याला