पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] अभ्यास 12५


विश्वांत अखंड आहे. देशांच्या आणि समुद्रांच्या मर्यादेने तिच्या वर्तुळांत खंड पडत नाही. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हा सिद्धांत आहे. यांत कोणत्याही उपाधीनें खंड पडत नाही अथवा त्यांत मर्यादाही उत्पन्न होत नाही. शरीर- दृष्टया, सूक्ष्मेंद्रियदृष्टया, मानसिकदृष्टया, इंद्रियातीतदृष्टया अथवा शुद्ध चैतन्य या दृष्टीनेही वस्तुतः कोठे खंड नाही. जीवित या शब्दाचा शास्त्रीय अर्थ काय ? जीवित या क्रियेचे स्वरूप काय ? जीवित म्हणजे प्राणशक्तीचे स्पंद. सर्वव्यापी आकाशतत्त्व समुद्रावर ज्यामुळे स्पंद उत्पन्न होतात त्याच- मुळे तुमच्या जीविताचे स्पंदही चालू असतात. दोघांची चालकशक्ति एकच. ज्याप्रमाणे एखाद्या तळ्यांत कमी अधिक प्रमाणाच्या जाडीचें बर्फ ठिकठि- काणी बनते, त्याचप्रमाणे आकाशतत्त्वाचे घनीभवन कमी अधिक प्रमाणानें होऊन हे विश्व बनले आहे. ज्याप्रमाणे वातावरणांतील वाफ कोठे अदृश्य असण्याइतकी सूक्ष्म, तर कोठे अत्यंत घनीभवनाने काळ्या ढगाचे रूप धारण करते, त्याचप्रमाणे आकाशतत्त्व कोठे विरल, तर कोठे घनीभूत वेग- वेगळ्या आकारांनी प्रकट होते. हे सारे विश्व म्हणजे जड वस्तूंचा एक महा- सागर आहे. या आकाशतत्त्वसागरांत वेगवेगळ्या परिमाणाच्या घनीभवनाने सूर्य, चंद्र, तारे आणि आपण स्वतः निर्माण झालो आहो. आपण एकमेकां- पासून बाह्यतः भिन्न भिन्न दिसत असलो तरी वस्तुतः एकरूपच आहों. आपल्या दृश्य भिन्नत्वामुळे मुळांतील समरसतेचा आणि ऐक्याचा भंग होत नाही-तें सर्वदा एकरूपच राहतें.
 अतींद्रिय शास्त्राचा अभ्यास आपण केला म्हणजे सर्व विश्व एकरूप आहे आणि त्यांत जड, सूक्ष्म, चैतन्यात्मक, मानसिक असे भेद नाहीत ही गोष्ट आपल्या लक्ष्यांत येते. आपणांस जो भेद दिसतो तो मुळांत वस्तुतः नसून आपल्या वेगवेगळ्या दृष्टिकोणामुळे दिसतअसतो, अथवा भासत असतो. आ- पल्या मनाची घटनाच अशी आहे की एका वेळी एकाच वस्तूचा विचार तें करीत असते. 'मी देह' अशी भावना आपल्या मनांत असते तेव्हां 'मन' म्हणून कांहीं वस्तु आपणाजवळ आहे हे आपण विसरलेले असतो. त्याचप्रमाणे 'मी मनोरूप आहे' अशी दृढ भावना आपणास करतां आली तर जड देहाचा विसर आपणास पडेल. आपलें खरें अस्तित्व म्हटलें म्हणजे 'मी आहे' या भाव- नेत जी अस्मिता आहे तितक्यापुरतेच आहे. मग या खऱ्या स्वरूपावर वाट-