पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] अभ्यास.११५

तो आपल्या ठिकाणी अज्ञान किती भरले आहे, हे आपणास कळू लागतें. मनुष्याचें मन हा एक मोठा अजबखाना आहे. त्यांत अनंत विचारांचे भांडार सांठविलेले आहे. माझ्या लहानपणी असल्या हठयोग्यांच्या अभ्यासाच्या गोष्टी मी ऐके तेव्हां मला हसू येऊन असल्या लोकांवर मनमुराद टीका मी करीत असे. आमच्यांतील पुष्कळ साधुसंतांनी सुद्धा असल्या प्रकारावर पुष्कळ कडक टीका केली आहे. कालेंकरून माझें वय वाढत जात आहे तो तो अशी टीका करण्याचा अधिकार आपणास नाही हेच मला अधिकाधिक पटत आहे. ते ज्या क्रिया करतात आणि त्या करीत असतां ज्या भयंकर विपत्ती ते भोगीत असतात, त्याच्या शतांश विपत्ती भोगण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी असते तर किती तरी बरे झाले असते, असेंही केव्हां केव्हां माझ्या मनांत आल्यावांचून राहत नाही. सूक्ष्म विचारांती या माझ्या भावनेचे खरे स्वरूप माझ्या लक्ष्यांत आले. स्वशरीराला पीडा करणाऱ्या या लोकांकडे पाहून मला राग येतो, त्यांना शिव्या देण्याची इच्छा मला होते; पण ही भावना पीडेची अनावड माझ्या चितांत आहे म्हणून उत्पन्न झाली असें मात्र नव्हे. माझ्या अंतःकरणाच्या कोमलपणाचा तो परिणाम नसून माझ्या भेकडवृत्तींतून ही असूया निपजली आहे. त्यांच्याप्रमाणे वागण्याची छाती मला नाहीं; तितकें धैर्य मजपाशी नाही. जे मला करवत नाहीं तें दुसऱ्यानी केलेलें मला पाहवत नाही.

 धैर्य, सामर्थ्य, मनोबल या मोठ्या विचित्र वस्तू आहेत. एखाद्याबद्दल बोलतांना, अमुक मनुष्य मोठा धैर्यवान् आहे, शूर आहे, मोठ्या छातीचा आहे अशी भाषा आपण वापरीत असतो. पण त्याच्या दानतींतील ज्या एखाद्या भागाकडे पाहून हा निकाल आपण देत असतो. तेवढ्यावरून त्याच्या एकंदर दानतीची परीक्षा होते असें मात्र नव्हे. एखादा शिपाई प्रसंगी तोफेच्या तोंडावरही धांवून जाईल; पणःशस्त्रवैद्याचा लहानसा चाकू पाहून भीतीने कदाचित् त्याची गाळण उडून जाईल. उलटपक्षी दुसऱ्या एखाद्याच्या अंगीं शत्रूच्या तोफेवर धावण्याचे धैर्य नसेल, पण जरूर पडल्यास शस्त्रवैद्याकडून एखादा मोठा अवयव तोडला जात असतांही सारे दुःख तो मुकाट्याने ने गिळून बसेल. याकरितां कोणाही मनुष्याचे परीक्षण करून त्याला भलाबुरा ठरवीत असतांना भलेबुरेपणाची आपली व्याख्या काय आहे