पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] अभ्यास. ११३

अभ्यास.

 प्राणायामाच्या आणि तशाच प्रकारच्या दुसऱ्या काही अभ्यासासंबंधी आज आपणास काही माहिती देण्याचा माझा विचार आहे. नुसत्या उपपत्तीसंबंधी आज इतका दीर्घ काळ अनेक प्रकारची माहिती मी सांगितली आहे की आतां प्रत्यक्ष अभ्यासासंबंधी काही माहिती सांगणे अवश्य झालें आहे. या विषयावर हिंदुस्थान देशांत फार मोठी ग्रंथसंपत्ति निर्माण झालेली आहे. ज्याप्रमाणे ऐहिक विषयांच्या बाबतींत तुम्ही पाश्चात्य लोक व्यवहारज्ञ आहां त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या बाबतीत आमचा देश मोठा व्यवहारकुशल आहे. संसाराच्या बाबतींत जसा चोख व्यवहार करण्याकडे तुमचे सारें ध्यान असते, त्याचप्रमाणे परमार्थाच्या बाबतींत आमची सारी अक्कल खर्च होत असते. तुमच्या देशांत पांचच माणसे एकत्र जमलीं तर ताबडतोब एखादी 'लिमिटेड कंपनी' काढण्याच्या गोष्टी त्यांच्यांत सुरू होतात, आणि अवघ्या पांच तासांच्या आंत तशी एखादी व्यापारी मंडळी प्रत्यक्ष अस्तित्वांतही येते. आमच्या हिंदुस्थानांत दहा पांच माणसांनी आपली डोकी पन्नास वर्षे घांसली तरी असले काम त्यांच्या हातून धडपणी निभावयाचे नाही. असल्या प्रकारच्या गोष्टींचा व्यवहारच त्यांना ठाऊक नाही; पण एखाद्याने एखादा नवा तत्त्वमार्ग काढला तर त्याला काही ना काहीं शिष्यमंडळी मिळावयाचीच. त्याच्या मार्गात खरोखर कांही तथ्य आहे की नाही हा विचारसुद्धा कोणाच्या मनांत यावयाचा नाही. त्याच्या उपपत्तीत अरण्यपांडित्य भरले असले तरीही शेंकडों शिष्य त्याच्यामागे धावतील. अहोरात्र बारा वर्षेपर्यंत एका पायावर उभे राहिल्यास मुक्ति खात्रीने मिळेल असे सांगणारा जरी कोणी उभा राहिला तरी तसल्या वेड्या पिराच्या मागे शेंकडों शिष्य लागतील आणि खरोखरच तसला अभ्याससुद्धा ते करू लागतील, हा अभ्यास चालू असतां शारीरिक क्लेश कितीही भोगावे लागले तरी त्यांजकडे ही मंडळी लक्ष्य देणार नाही. असले हाल मोठ्या आनंदाने ते सोसतील. कित्येक पंथांतील लोक वर्षानुवर्ष आपला हात उभाच्या उभास्वा०वि०९-८