पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

आपण अधिक ज्ञानी असे आपणास वाटते, पण हा आपला भ्रम आहे.अतींद्रियशास्त्र पांच हजार वर्षांपूर्वीच अगदी कळसाल पोहोचून गेले होते.त्याचप्रमाणे अति प्राचीन काळीच धर्मविचारही पूर्णता पावले होते. याबाबीत आपली सांप्रतची करामत म्हटली तर निराळ्या भाषेत तेच सिद्धांत पुन्हा उगाळणे इतकीच आहे. फार झाले तर त्या सिद्धांतांची सत्यता सिद्ध करण्यास काही नवी उदाहरणे आपण पुढे करतो. यामुळे या परस्परविरोधी मतांचे युद्ध आजतागाईत असेंच चालू आहे. एक पक्ष आम्हाला विविधतेशी जखडून ठेवण्याचा यत्न करीत आहे आणि दुसरा त्याविरुद्ध मांडत आहे. सकृद्दर्शनी अनुलंध्य अशी प्रमाणे उभी करून पहिला पक्ष विविधता चिरस्थायी आहे व ती तशीच राहणार असें अट्टाहासाने सांगत आहे. ज्याला आपण जीवित असें म्हणतों तो विविधतेचा परिणाम आहे असे तो म्हणत आहे. उलटपक्षी दुसरी बाजू ऐक्याकडे आपणास तितक्याच अट्टाहासाने ओढूं पाहत आहे.

 नीतिशास्त्राच्या दृष्टीने या प्रश्नाचा विचार करतां या विरोधी मतांच्या लढाईत हे शास्त्र पडलेले नाही असे आढळून येते. या रणांगणाच्या आसपासही राहूं नये अशा विचाराने ते तेथून पुष्कळच लांबवर गेले आहे. या लढाईचा संपर्कही स्वतःस लागू न देतां आपला मार्ग अगदी स्वतंत्रपणे काढणारे असे एखादें शास्त्र असेल तर तें नीतिशास्त्रच होय. अशा प्रकारची एखादी लढाई चालू आहे हा विचारसुद्धा न करतां ऐक्याच्या दिशेने आपला मार्ग तें आक्रमीत आहे. नीतिशास्त्राचा मूळ पायाच ऐक्य हा आहे. प्रेम हे नीतिशास्त्राचे जीवन. विविधतेकडे नीतिशास्त्र ढुंकूनही पाहावयाचें नाही. सर्वत्र ऐक्य उत्पन्न करावयाचें, या एकाच इराद्याने आपले कार्य तें करीत आहे. मानवजातीने शोधून काढलेले नीतिशास्त्राचे अत्युच्च नियम चाळून पाहतां, त्यांत विविधतेला थाराही मिळावयाचा नाही असे आपणास आढळून येईल. विविधता ही कोणत्या जातीची उपपत्ति आहे याची चौकशी करण्यापुरताही वेळ, जणू काय, त्याला नाही. त्याचा उद्देश एकच. सर्वत्र ऐक्य घडवून आणावें एवढीच गोष्ट तें जाणते. आमच्या हिंदुशास्त्रकारांची मनःप्रवृत्ति स्वभावतःच पृथकरणप्रिय आहे. विचाराकरितां एखादा पदार्थ त्यांनी हाती घेतला की त्याचे सगळे घटक वेगळे करून त्यांचा पुरा शोध