पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] हक्क. १०५

प्रश्नाच्या पोटी सर्व साम्याच्या तत्त्वाचाच अंतभीव झालेला असतो; तथापि मनुष्यस्वभावच असा आहे की गोड ऊंस मुळासकट खावा. कोणत्याही कारणाने त्याला विशिष्ट हक्कांची प्राप्ति झाली की त्यांच्या रक्षणासाठी त्याची धडपड एकसारखी सुरू असते. आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी सारे बुद्धिबल तो एकत्र करीत असतो. बुद्धिवादांत प्रतिपक्षाला नामोहरम करण्याकरितां अगदी एकदेशीय विचारही पुढे आणावयास तो कचरावयाचा नाही. या प्रश्नाला दोन बाजू आहेत ही गोष्ट विसरणे त्याला अधिक सोयीचें वाटते. यामुळे प्रतिपक्षाच्या विचारसरणीकडे ढुंकूनही न पाहतां आपलेंच म्हणणे तो पुनःपुन्हां मोठ्या आवेशाने प्रतिपादित असतो. ही तऱ्हा दोन्ही पक्षांत सारखीच आढळून येते.

 अतींद्रिय शास्त्राच्या दृष्टीने विचार करतां हाच प्रश्न आणखीही एका स्वरूपाने आपणासमोर उभा राहतो. विश्वांत आकारांची विविधता आहे. या विविधतेच्या पोटी कोठे एकतानता आहे की नाही हा प्रश्नच विचारार्ह नाहीं असें बौद्धांचे म्हणणे आहे. जग आहे असेंच घेऊन चालण्यांत आपलें नडतें कोठे असा उलट प्रश्न ते विचारतात; आणि ज्या अर्थी आपलें नडत नाहीं त्या अर्थी ते आहे तसेंच ठीक म्हणून चालणे त्यांना इष्ट वाटते. ते ह्मणत्तात विविधता हेच जीविताचें सारसर्वस्व आहे. बाह्यतः ती कितीही दुःखप्रद आणि दुबळी वाटत असली तरी जीविताचें सारे स्वारस्य तींतच आहे. याकरितां ती टाकू पाहणे म्हणजे जीवित निःसार करणे होय. " यावर वेदान्त उत्तर देतो, “ मूलस्थानापासून भ्रष्ट झालेल्या आणि त्यामुळे विविधता पावलेल्या या रूपाकडे पाहूं नका. जेथून ही विविधता उत्पन्न होते त्या मूल एकरूपाकडे पहा." यावर बौद्ध म्हणतात, एकरूपता ही काल्पनिक वस्तु आहे. प्रत्यक्ष अनुभवाच्या विविधतेला सोडून काल्पनिक ऐक्याच्या मागे का लागता? " प्राचीन काळी असलेला हा मत विरोध आपल्या आजच्या काळापर्यंत असाच चालत आला आहे. प्राचीन काळापेक्षा सध्याच्या काळी आपल्या ज्ञानांत कितीतरी मोठी भर पडली असतां धर्मविचारांत आणि अतींद्रिय शास्त्राच्या सिद्धांतांत एवढा विरोध का असावा असा प्रश्न कदाचित् उभा राहील; पण त्याला उत्तर हेच की प्राचीन काळापेक्षा सध्याच्या काळी ज्ञानाच्या समवायी रूपांत फारशी भर पडलेली नाही. पूर्वीच्या लोकांहून