पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

असतांही तशी भावना करणे किती कठीण झाले आहे पहा ! एखादी क्षुद्रवस्तूही आपला समतोलपणा बिघडविण्यास पुरेशी होते. आपला तोल इतका नाजुक झाला आहे की एखाद्या क्षुद्र वस्तूच्या यत्किचित् आघाताने आपण कोसळून पडतो. अशा वेळी मी अनंत आहे ही भावना आपण आपल्या ठिकाणी जागृत ठेविली पाहिजे. वस्तुस्थिति तशीच आहे. आपण अनंत आहोंच, आणि आपली ही सारी धडपड त्या मूळ स्वरूपाला पोहोचण्याकरितांच आहे. आपणास समजत असलें अथवा नसले तरी आपल्या प्रत्येक खटपटीचा आदि हेतु तोच आहे. आपण स्वतः बद्ध आहों; पण मुक्त वस्तु काय आहे, याचा शोध करण्यासाठीच आपली ही सारी खटपट आहे.
 ज्याला कसल्याही प्रकारचा धर्म ठाऊक नाही असे एकही मानवकुल अस्तित्वात नाही, आणि पूर्वीही कधीं अस्तित्वात नव्हते. एखादा मानववंश एकाच परमेश्वराचे पूजन करीत असेल, अथवा दुसरा एखादा वंश तेहतीस कोटी देव पूजीत असेल, पण देव-धर्म कांहींच ठाऊक नाहीं असें कुल मात्र एकही नव्हते. आतां तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व खरोखरच आहे की एकच देव खरा, हा प्रश्न वेगळा; पण पूजनाचा कोणता ना कोणता प्रकार मनुष्याच्या उत्पत्तीपासून चालू आहे हे मात्र खरे. मनुष्याच्या या मानसिक अवस्थेचें पृथक्करण केले तर काय आढळून येते ? एक अथवा अनेक देव शोधून काढण्यासाठी एवढी धडपड कां ? या शोधांत सारे जग जें गुंतलें आहे तें कां ? याचे कारण हेच की मनुष्य आपली मुक्तावस्था विसरला नाही. आपण स्वतंत्र आहों ही जाणीव अद्यापिही त्याच्या ठिकाणी आहे; आणि ही जाणीव त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याच्याभोंवतीं प्रकृतीचे जाळे पडले आहे. त्या जाळ्याच्या धाग्यांनी त्याचे हातपाय पक्के जखडले आहेत. आपला करडा अंमल सृष्टि त्याजवर गाजवीत आहे. प्रकृतीच्या कायद्यांची चक्रे त्याची हाडे भरडून काढीत आहेत. या चक्रांत मनुष्यप्राणी इतका पक्का अडकला आहे की एक गहूंभरसुद्धा इकडे तिकडे मान हालविण्याची सोय त्याला उरली नाही. तो कोठेही जावो अथवा काहीही करो; हा कायदा त्याच्या पाठीपोटी दत्त म्हणून उभा आहेच. या कायद्याचे अस्तित्व नाही असे ठिकाण या विश्वांत एकही नाही. अशा रीतीने चौफेर कोंडमारा झाला असतांही हा मनुष्यप्राणी मुक्तीसाठी धडपडत आहे. स्वतःच्या मुक्तीचा