पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] वेदांत व हक्क. ९९

आणि याकरिता माझ्यासारख्या एखाद्या मनुष्याने आपला विशिष्ट हक्क गाजविला तर ती गोष्ट कोणाच्या लक्ष्यांतही यावयाची नाही असे धर्मगुरूंना वाटत असते. याचप्रमाणे श्रीमंत लोक आणि प्रत्येक देशांतील सत्ताधारी माणसे आपल्या कल्पनांत चूर असतात. अशा रीतीने या तत्त्वाला सारे लोक माना डोलवीत असतां समाजाचा एखादा लहानसा भाग बाकीच्या मोठ्या भागावर स्वेच्छेप्रमाणे सत्ता गाजवीत असतो. पण यांत खरें नुकसान सत्ताधीशांचेच आहे. लोकांवर सत्ता गाजवावी या हौसेने ते इतके वेडे झालेले असतात की कसल्याही प्रसंगी ही त्यांची इच्छा त्यांचा पिच्छा सोडीत नाही आणि आशा सुटेना व देव भेटेना अशा स्थितीत ते पडतात. उलट पक्षी यांच्या पायांखाली दडपलेल्यांची स्थिति याहून वेगळी असते. त्यांना आधी आशापाशाच थोडे आणि जे असतात तेही कमकुवत. यामुळे मुक्तीचा मार्ग त्यांना जितका सुलभ आहे, तितकाच सत्ताधीशांना तो दुर्लभ आहे. सिंह कितीही दुष्ट झाला तरी तो पशूचा राजा. त्याचे दुष्टत्व कोल्ह्याच्या दुष्टत्वासारखें नीचपणाचे असावयाचें नाहीं. एक चपेटा मारून सिंह कोही वेळ तरी खुशाल झोपी जाईल, पण कोल्हा असा जबर तडाखा मारावयाचा नाही आणि आपल्या भक्ष्याची पाठही सोडावयाचा नाही. तो एकसारखा त्याच्या मागे मागे राहील आणि प्रत्येक संधीस काही वेगळाच दुष्टपणाचा प्रकार करील. एकही संधि तो वाया जाऊं द्यावयाचा नाही. अशीच स्थिति जन्मजात धर्मगुरूची आहे. ते स्वभावानेच दुष्ट आणि सहृदयताशून्य असतात. याचमुळे धर्मगुरूंचा सुळसुळाट आणि धर्माची पिछेहाट ही बरोबरीने चालत असतात. हक्कांची कल्पनाच पार झुगारून दिली पाहिजे असें वेदान्ताचे सांगणे आहे. ही कल्पना नाहीशी झाली झणजे धर्माचा अभ्युदय होईल. हक्कांचा सुळसुळाट समाजांत आहे तोपर्यंत धर्माचे अस्तित्व त्यांत असावयाचें नाही.
 " तुझ्यापाशी जे काही असेल तें विकून टाक आणि तो पैसा गरीबगुरीबांना वाटून टाक " असें एक ख्रिस्ताचे वचन आहे. या वचनावर तुमचा विश्वास आहे काय ? समतेच्या तत्त्वाचे व्यावहारिक स्वरूप काय हे ख्रिस्ताने यांत दाखविले आहे. अमुक एका दृष्टीने मी मोठा अथवा सामान्य जनांपासून मी वेगळा ही भावना उत्पन्न होऊ न देण्यास काय केले पाहिजे हे