पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] एक उघडे रहस्य. ५

आहेत; मग यांत उच्च कोण आणि नीच तरी कोण? एखाद्या मोठ्या वस्तूच्या अस्तित्वाकरितां अत्यंत लहान अशा परमाणूच्या अस्तित्वाचीही जरूर आहे. तो क्षुद परमाणु नाहीसा झाला तर त्या प्रचंड वस्तूचे अस्तित्वही संपुष्टांत येईल. अशा स्थितीत अमुक लहान आणि अमुक मोठा याचा तरी निश्चय कसा करावा ? असा निवाडा निश्चितपणे करणे शक्य नाहीं; कारण लहान आणि मोठा असा भेद मुळांतच नाही. प्रत्येक वस्तूंत तोच अनंत महासागर अंतर्बाह्य व्यापून आहे. अत्यंत क्षुद्रशा दिसणाऱ्या वस्तूचे वास्तविक स्वरूप अनंत हेच आहे. आपल्या डोळ्याला बाह्यतः जेवढे दिसत असतें तें स्वरूपही वस्तुतः अनंत आहे. हे समोर दिसणारे झाडही वस्तुतः अनंतरूप आहे, आणि याचप्रमाणे विश्वांतील यच्चयावत् वस्तू अनंत आहेत. आपण जे जे काही पाहतों अथवा स्पर्शद्वारा ज्या ज्या वस्तूचा अनुभव आपणास होतो ती ती वस्तु अनंतरूप आहे. वाळूचा एक कण, प्रत्येक विचार आणि जीवात्मा आणि जिला अस्तित्व म्हणून आहे अशी प्रत्येक वस्तु अनंत आहे. जें अनंत तें अनंत आहेच; पण जें सान्तसे दिसतें तेंही अनंत आहे. आपल्या अस्तित्वाचे स्वरूप या प्रकारचे आहे.
 आतां इतकी गोष्ट मात्र खरी की या आपल्या अनंतत्वाची चांगलीशी जाणीव आपल्या ठिकाणी नाही. आपल्या सध्याच्या स्थितीत ही जाणीव बहुधा अगदी पुसट अशी झाली आहे. आपली ही जाणीव समूळ नष्ट झाली आहे असे मात्र समजूं नये; कारण तसे करणे कोणालाच शक्य नाही.आपण चिरंजीव आहो असेंच आपणास नित्य वाटत असते. माणसें मरतात ही गोष्ट प्रत्यही आपल्या डोळ्यांनी पाहत असतांही आपण अमर आहो असें आपणास वाटत असते. आपण मरून नाहीसे होणार असा विचार कोणाच्याही मनांत येत नाही. अनंत अस्तित्वाशी जो आपला नित्य संबंध आहे त्याचें कार्य अदृश्यपणे आपल्या ठिकाणी अविरत चालू आहे. आपण आपलें अनंतत्व अंशतः विसरलो आहों हेच आपल्या साऱ्या दुःखाचे कारण आहे. आपल्या रोजच्या चालू व्यवहारांत बारीक सारीक गोष्टींपासूनही आपणास उपद्रव होतो. बारीकसारीक जीवजिवडेही आपले धनी होऊन बसत असतात. आपण स्वतः क्षुद्र प्राणी आहों असा जो भ्रम आपणास झाला आहे त्यामुळेच ही सारी दुःखें आपण आपणावर ओढून घेतो. पण आपण अनंत