पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
Left
right
center

दोनच चाली येत होत्या १९

हे रसज्ञ मंजुळ गीतें, गाउनी हे तुमच्या मधुर रसातें, प्राशुनि हे तुमच्या भोंतें भोंतें हिंडुनी म्हणतात जगाला ह्याच फुलांमाझारी आम्हि जन्म घालवू ! सौख्य हेच संसारी-१ हे त्याच फुलांचे संमेलन हो झालें! हा हार पाहुनी नाथ जगाचा डोले ! ह्या पुण्यसंगमा येउन असतें नमिलें, परि दैव आडवें मज दीनेला झालें! घ्या ! नमस्कार मम घ्या हो, मानुनी तरि हाच मला हो लाहो! जन्मुनी संबंध कवींनो राहो, ह्या जनीं मी बहीण आपण, भाऊ सखे कैवारी-! तुम्ही, कवि भिकारिण मी तुमच्या हो दारी!-२ मला त्या वेळी दोनच चाली येत होत्या. माझी करंज्यांतील मोदक ही कविता ह्याच चालीवर आहे. ती बरीक अगदीच माझी कविता आहे. असो. जळगांवच्या संमेलनांतील माझ्या ह्या कवितेवर रा. तिवारी व कै. रा.अनन्त- तनय ह्यांनीहि आपले विचार काव्यरूपानें म्हणून दाखविले. अनन्ततनयांची ही कविता १५ मार्च १९०७ च्या ख्रिस्ती नागरिकांत छापली आहे. हो. ह्याच वेळेस तेथे जमलेल्या मंडळींत टिळक ख्रिस्ती म्हणून कोणी त्यांची हेटाळणी केली वाटते. अनन्ततनयांनी संतापून खाली दिलेली कविता लिहिली आहे- तूं दहन भूमिंतिल पुष्प जयाला गणिशी ते त्याज्य कसें तें सांग एकदां मजशी. गुण अन्य फुलांचे ह्यांत न कां वद वसती जे रसिकां भ्रमरां दास करोनी घेती नवनीत मृदुल हे स्पशी । नाहिं का