पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
Left
right
center

१८ जळगांवचे कविसंमेलन

व्यवस्थापक मंडळीच्या तर्फेनें आपले नम्र सेवक, नारायण वामन टिळक माधवराव लक्ष्मण खांबेटे यशवंत गंगाधर दिक्षित नारायण नरसिंह फडणीस जळगांव २४-२-०७ वरील पत्रांत टिळकांची सही पहिली आहे व भाषाशैलीहि त्यांचीच आहे. शिवाय काव्य रत्नावलीचा अशा त-हेने उल्लेख नानासाहेब फडणीसांनी स्वतः लिहिलेल्या पत्रांत केला नसता. तसेच घरांतील गडबडीवरून जणूं काय टिळकांच्याच मुलाचे लग्न होते असे एखाद्याला वाटलें असतें. नानासाहेब फडणीसांनी पुढे बहुतेक सर्व खरकटं काढलें-पण तें करून ठेवलें टिळकांनी ! ह्या संमेलनांतूनच बालकवि ठोंबऱ्यांचा वाङ्मयिक जन्म झाला. आणि माझ्या सारखी अडाणी बाईहि जरा अधिक जोराने तेथूनच गाऊ लागली. जळगांवला जाण्याचा टिळक मला आग्रह करूं लागले, पण माझें पोट दुखत होते-तशांत घरांत म्हशी होत्या! त्यांच्याकडे माझें अर्धे लक्ष्य- तेव्हां मी कशी जाणार? पण मी एक कविता लिहून जळगांवच्या संमेल- नास पाठवून दिली. अर्थात् तिच्यावरून टिळकांचा हात फिरला होता. पण ज्या ओळीमुळे ती सर्वांना इतकी आवडली तिला मात्र त्यांचा हात लागला नव्हता. ती ओळ म्हणजे “तुम्ही कवी, भिकारिण मी हो तुमच्या दारी-" सबंध कविता अशी आहे. ही काव्यतरूची छाया शीतल भारी, तुम्हि कवी फुलें हो ह्या तरुवरची सारी.-धृ० तुम्हि हसता हसती, सृष्टि, सर्व नरनारी तुम्हि कोमुन जातां जगीं खिन्नता सारी हा सुगंध तुमचा व्यापि दिशांना चारी मग वाटे भरलें सुखच जगामाझारी