पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
पुनर्जन्म

 असो. ह्या कवींची ही त्यावेळची माहिती काहीहि असली तरी पुढें ते एक भगवद्भक्त म्हणून फार प्रसिद्धीला आले व त्यांची ती प्रसिद्धी यथायोग्यहि आहे.

  • * *

 टिळकांना पुन्हां नगरचे आमंत्रण आले. नगरास डॉ. ह्यूम ह्यांचा ईश्वर-विद्येचा वर्ग होता. त्यांत शिकविण्याचे काम टिळकांना होते. पण मध्यंतरी त्यांनी मिशनचे काम सोडून देऊन राहूरीस वास्तव्य केले होते. आतां डॉ. ह्यूमसाहेबांनी त्यांना पुन्हां मोठ्या आग्रहानें बोलावले व टिळकांनी तें कबूल केले. पुन्हां नगरास आमच्या जुन्या घरी रहायला आलो. राहूरीचें घर, शेत, विहीर वगैरे सारे शहाजी भिलाच्या ताब्यांत देऊन आम्ही सारे परत नगराला आलो.