पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३ : पुनर्जन्म

 राहूरीचीच गोष्ट. टिळक कसल्याशा ख्रिस्ती संमेलनासाठी जालन्यास गेले होते. घरची पाहुणे मंडळीहि पांगली होती. मात्र दत्तू पुण्याहून सुट्टीला घरी आला होता. निळकंठराव मामा, त्यांचे कुटुंब, दोन मुले, चिमबाबा, बेबी व मी इतकीच माणसें घरी होतो.
 टिळक जाण्याच्या अगोदर शहाजी भिलाला कामावरून काढून टाकलें होते. पण तो कामावरून दूर होतांच घरावर दगड येऊ लागले. एक दिवस चोर अगदी घराजवळ आले. निळकंठरावमामा त्यांच्यामागे लागले. जोंधळा गळ्याइतका वाढला होता. हे लोळकांडे जात जात कुठल्याकुठे कोना कोपऱ्याला गेले होते. आम्ही सगळे कंदील काठ्या वगैरे आयुधे घेऊन त्यांच्यामागे चाललो होतो. पलीकडे जोंधळ्यांच्या ताटांचा सळसळ आवाज येत होता त्या अनुरोधाने आम्ही चाललों. चोर मामांच्या हातचा बेदम मार खाऊन पडलेला आढळला. छान झाले. आम्हांला वाटलें आतां चांगली दहशत बसेल चोरांना. आम्हीहि धीर करून त्याला मारायला काठ्या उगारल्या. तो मामा कण्हून सांगू लागले मी चोर नाही. चोर पळाला. मी मामा आहे ! खरेंच मामा ! सर्वांनी मिळून त्यांना उठवून घरांत आणले. मामा फार म्हणत असत, की माझ्या तावडीतून कधीं चोर सुटणार नाही. पण त्या दिवशी मात्र आम्हांला अनुभव वेगळा आला. पुन्हां शहाजी भिलाची राखणदार म्हणून स्थापना झाली व नंतर मात्र चोरांचा त्रास कधीच झाला नाही.
 ह्या ठिकाणी आल्यावर माझ्या प्रकृतींत फारच सुधारणा झाली. मी इतकी फुगायला लागले की काहींच्या बाहीच. हातांत बांगड्या व गळ्यांत गळसऱ्या तटाटू लागल्या. थोडक्यात म्हणजे राहूरीस गेल्यावर मी चांग- लीच वजनदार वायको झाले होते. कां नाही होणार ? स्वतःचे सत्तेचे घर, मनाप्रमाणे सर्व काही जेथल्या तेथें व्यवस्था. दारी एक सुंदर बगीच्या केला होता. त्यांत कांहीं एरंडाचीहि झाडें होती! एरंड्या निघाल्यावर त्यांचे मडकें भरून ठेवले. नंतर त्या एरंडाचे माझ्या डोक्यात गुऱ्हाळ सुरूं