पान:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
गो पा जी

 "व्हो तो चष्मखाने में पानी दालकर उनको धुलानेके लिये है."
 "म्हणजे बुबळं बाहेर काढून त्या खांचेंत पळीसारखे ढवळणार की काय?"
 नंतर डॉक्टरांनी खुणेने पेशंटला जवळ बोलावले. वीरासन घालून उजव्या हातांत त्यांनी सुरी धरली. पेशंटच्या मागें आधाराला नर्स उभी राहिली. सुरीचें टोंक डोळ्याच्या कोपऱ्याजवळ येतांच पेशंटने डॉक्टरच्या हाताला झटका दिला व तो झटक्यासरसा उभा राहून पळू लागला. ती ब्रह्महत्त्या त्याच्या पाठीमागे लागली. गोपा पुढे, त्याच्यामागें डॉक्टर व त्यांच्या मागें नर्स! सगळ्या घरभर व घराभोंवतीं ही धांवपळ सुरू झाली. डॉक्टरांना त्याला पकडतां आलें असते पण ते मुद्दामच थोडें अंतर मध्ये ठेवीत होते. आम्ही प्रेक्षकहि ह्या लोळकांड्यामागे होतोच. मी म्हणे पुरे ग बाई तुझ्या भावाचे हे; ह्यापेक्षा एखादें प्रिस्क्रिप्शन नाही तर चष्मा का नाहीं देत?
 व्हर्जिनियाबाई म्हणे,
 "मेरे भाईजान इतने आच्छे डॉक्टर है के अगर वे एक वख्त कोई हमदरदी उनके कब्झेमें आया तो उसकू तनदुरुस्त करे बगर छोडतेही नहीं."
 शेवटीं अतीच झाले तेव्हां सुगंधरावांनी डॉक्टरांच्या कमरेला विळखा घालून त्यांना खाली बसविलें व हौशीच्या नवऱ्याने गोपाला शांत केलें. घरांतील सर्व मंडळी हंसून हसून बेजार झाली. आम्ही सर्व पूर्ववत आपा- पल्या जागी बसलो. मी पुनः नर्सबाईच्यातर्फे डॉक्टरांना प्रश्न टाकला, की एकादे प्रिस्क्रीप्शन किंवा चष्मा का नाही देत ? पुन्हां कुडबुड सुरूं झाली. डॉक्टर डोलू लागले. त्यांनी आपल्या डोळ्यांचा चष्मा काढून गोपाच्या डोळ्यांला लावला. त्याला त्या चष्म्याने अगदी स्पष्ट दिसले. गोपा खूष झाला. डॉक्टरांनी चष्म्याचा नंबर त्याला लिहून दिला. मग प्रिस्क्रिप्शन लिहिले. त्यांत पेशंटचे नांव लिहिले होते. Go-paji- !
 झाले भ्रमाचा भोपळा फुटला. पुन्हां एकदा हास्याचा फार मोठा स्फोट झाला. गोपा आतां भयंकर रागावला. डॉक्टरांनी त्याला मिठी मारली.