Jump to content

पान:स्मरणशत्त्कीची वृद्धी.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वैजयंतीचा मणि २ रा.

मुळे मार्क वीसच्या वीस ! कारण आमचे ठाण्याचे धाकोबा वैद्य पोट दुख- ण्यावर कुचल्याचें औषध बिया तळून करीत, व तें आमचे वडील फारच जपून ठेवीत. त्या गोष्टीची रेशमाची गांठ तुटेल पण सुटणार नाहीं ! आमचे प्रोफेसर कोण ? आजीबाई, माळीदादा, नेमा गांधी, व कधीं कधीं संभ्या झार ! दीर्घ परिणाम - कॉलेज सोडल्यावरसुद्धां डाक्टर सखाराम अर्जुन व डाक्टर अण्णा मोरेश्वर कुंटे बी. ए. एम्. डी. यांच्या घरीं देशी औषधांचे नमुने ओळखून त्यांचीं वोटनिकल नांवें देण्यास मदतगार मी ! पहा माझ्या फैलीवरील अस्सल पत्रे. कलेक्टर आरवथनाट साहेबांस सन १८७८ च्या पारीस प्रदर्शनाचें काम सरकारने दिलें. अडचण पडली. भायखळा क्लवमध्ये जेवणावर गोष्ट काढली. पुढे नांव माझ्या प्रोफेसरानें माझेंच दिलें. काम उत्तम झाल्याबद्दल बक्षीस सरकारांतून ३०० रुपये कमावले, आणि वरती इंडियासरकारांतून कलकत्यास त्याच कामाकरितां मुद्दाम पाचारण! त्यांच प्रसंगीं Mr. x x x x is an authority on raw products (कच्या मालाविषयीं रा. रा. xxxx यांचें मत प्रमाण- भूत मानावें अशी यांची योग्यता आहे) ह्मणून मुंबई सरकारच्या पदरीं शेरा ! पाहून घ्या. सरकारी ठराव कागद पत्र कायम आहेत. परिणाम कशाचा? तर स्मरणमणि-माला कशी तयार करावी, याची गुरुकिल्ली हातीं आलेली ! धन्य त्या गुरूची ! हा प्रताप त्याचा आहे. परीस तो! आह्मी तर लोखंडाचे नाल ! मुला, तूं ही किल्ली घे पाहूं हातांत, आणि " नर करणी करे तो नरका नारायण हो जाय" असें प्रत्ययास आणून दे. माझा वैजयंति- धारक परमात्मा तुला यश देवो!

          *               *               *

 ह्मणे नर करणी करे तो - - प्रोत्साहन; अलबत !

 गोष्ट पांचवी:- डाक्टर कर्नल का. र. कीर्तीकर ! क्षुल्लक चुकीवरून पडलेल्या चुरसाचुरसीमुळे नुकसान केल्यावरून त्वेषास चढून विलायते जाऊन, मेवंड येथल रणसंग्रामांत कीर्तिध्वज उभा करून, आपल्या