३
शाळेत गेल्यानें विद्या येणार काय ? काय बगलेत तारायंत्र आहे ? वापाला इतकें समजत नाहीं कीं जॉन्सन्स रॅम्ब्लर हें पुस्तक फार कठीण आहे. मुलाने थाप मारली आणि चाप आले पुस्तक मागायला ! हें पहा ! मी भविष्य सांगून ठेवतों. हा शामू समुद्रांत बुडी मारून कोरडाच राहणार. मी त्याला पक्का ओळखून आहें. " तसेंच झालें. शामूअण्णाचे थोडे पेन्शन घेऊन अण्णासाहेव झाले आहेत. पण घरांतल्या घरांत ! सरस्वती मंदिरांत कधींच तेज पडल नाहीं-कारण बुद्धि चांगली, पण पाया शुद्ध नाहीं. लहान लहान सोपीं पुस्तकें प्रथम शिकून, सोपान- मार्गानें न गेल्यामुळे सगळाच बोजवार झाला !
तर मग, नुसती घोकंपट्टी, आणि लहान तोंडी मोठा घांस हीं दोन्हीही
त्याज्य आहेत, असें ठरतें. शद पाठ करूं नयेत असे आमचें ह्मणणें नाहीं.
पण ते पाठ करतांना त्यांच्याकडे लक्ष ठेवावें. पुस्तकाकडे पाहावें, शब्द
पाटीवर अगर स्मरण वहीत लिहावा- त्याचा वाक्यांत उपयोग कसा केला
आहे, कोणच्या अर्थानें केला आहे, तितकें समजून घ्यावें. त्या
शदापासून विशेषण, क्रिया विशेषण, नाम, किंवा क्रियापद करें तयार
.. होतें, तें कोशांत पहावें; व अखेर त्याचा उपयोग करून आपण आपल्या
अक्कल हुशारीनें एक एक दोन वाक्यें रचावीं, ह्मणजे सांखळी तयार. अशा
रीतीनें मेंदूत ठसविलेला शब्द आला कीं मागची सर्व सांखळी समोर उभी
राहते. नच राहिली तर त्या शब्दाची ओळख पटण्याकरितां, "बरें, हा
शब्द असा होता ?" असा आपल्या मेंदूस प्रश्न करावा. आठवण झाली
तर ठीकच; न झाली तर शब्द चोपडींत लिहून रात्रीं निजतांना सदर
प्रश्न मनांत ठेवून निजावें, कीं सकाळी उजाडल्याबरोबर प्रश्नाचे उत्तर
हात जोडून उभें असतें. करून पहा ! विश्रांति मिळाल्यामुळे मेंदूस जीव
येतो, व सांखळींतील सर्व कड्यांची झडती घेऊन पोलीस तपास करून
चोरीचा पत्ता लावून डिटेकटिव्ह ( गुप्तपोलीस ) साहेब तयार असतो.