२९
.
यावरून गुळगुळीत गोट्यासारख्या डोक्यापेक्षां उंच सखल असलेलें डोके जास्ती तरतरीत असतें, हैं लक्षांत ठेव ह्मणजे झालें. आणखी एक गोष्ट ध्यानांत ठेव कीं, एकच नाद वरा नाहीं, हेंच तत्व तुझ्या मनावर चांगलें ठसण्याकरितां असे कर-एकाद्या सुटीच्या दिवशीं कांहीं सोवती घेऊन कोठें तरी फिरण्यास जा. परत आल्यावर प्रत्येक सोबत्यास आपण आज पाहिलेल्या भागांत काय काय मजेदार गोष्टी किंवा जिनसा आढ- ळल्या त्यांच वर्णन स्वभाषेंत अलग लिहिण्यास सांग, आणि मग पहा कशी मजा उडते ती ! कोणी ह्मणेल, सूर्यनारायणाचे किरण पडून मेघमंड- ळांत संध्याकाळी काय तरी मजा दिसत होती! कोणी ह्मणेल, अहाहा ! तो देशपांड्याचा वाग फारच सुंदर 'बुवा ! तिसरा म्हणेल, काय त्या घोड्यांची मजा ! चौथा ह्मणेल, राजाबाई टावरची ऊंची सावलीवरून मोजण्यास मोठी गम्मत वाटते. पांचवा ह्मणेल मुलांचे पतंग वर कां व कसे जातात? तर साहावा ह्मणेल भरतीच्या लाटा कशा उसळतात ? पाणी आमच्याकडे कोण ढकलतो ? तर एक वाव्या ह्मणेल काय हो ते शिद्दी तेलकट, उघडे वोडके, काळेकुड्ड! आणखी एकादा सगळं सोडून आपण गोळा केलेल्या शिपांतील रंगबैचित्र्य, रूपवैचित्र व त्यांत कांहीं नियमितपणा असल्याबद्दल तर्क चालचील. पण दुसराच एकादा दूरच्या किल्याकडे लक्ष पोंचवून, मराठ्यांच्या पराक्रमाची वाखाणणी करील. हें विचारवँचित्र्य एकत्र करून नीट तर्क केलास तर वर्गात कोणता मुलगा कोणत्या विषयांत जास्ती मन घालतों, हें तेव्हांच तुझ्या लक्षांत येईल. कारण काय ? त्याच्या मेंदूतील नियमित ठिकाणीं जास्ती सळ पडले आहेत, तोच भाग आपल्या उजव्या हाताप्रमाणे कामाच्या वेळीं आपोआप पुढे येतो ! याकरितां धार- वाडी कांटा समतोल राखण्याचा यत्न करावा.