Jump to content

पान:स्मरणशत्त्कीची वृद्धी.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
वैजयंतीचा मणि २ रा.

( जनावराचें मांस नव्हें ) वाढलें ह्मणजे आंत उत्पन्न झालेला पाक बाहेरील भागांस ढकलीत जातो, त्यामुळे या झाडांच्या बुंधांतील बाहेरचा भाग टणक होत जातो. वेताची छडी घेऊन ती आडवी काप. तिच्या मधोमध चाकूनें, सुईनें, अगर टांचणींने टोंचून पहा. नंतर सालीजवळ बाहेर टोंच. कठीण लागते. कां ? लागते कीं नाहीं? की हातावर पाहिजे ? 'असो. आतां आंब्याचा ओंडा घेऊन त्याच्या तोडलेल्या भागाकडे पहा. मध्ये काळा गाभा आहे, तो जास्ती टणक आहे. त्याच्या बाहेर थरावर धर आहेत ते नीट टोंचून पाहिले तर जास्ती मऊ आहेत, असे आढळते. तिसरा प्रकार सीतेचे केश अथवा फर्न यांत आहे. त्याची आप- ल्यास सध्या गरज नाहीं. एकंदरींत सांगायचें काय कीं, मेंदू अंतर्बाह्य आहे. त्यांत जशी आपण भर घालूं, तसा तो वरवर म्हणजे कबन्दीकडे टणक होत जाईल. पण हे बघ ! टणक म्हणजे लाकडासारखा नाहीं किंवा हाडांसारखा नाहीं. उन्हाळ्यांतलें लोणी आणि बर्फात ठेवलेलें घट्ट लोणी इतकाच काय तो फरक.

 याप्रमाणे मेंदू वाढू लागला म्हणजे वरच्या कवचीस ढकलीत जातो. लहानपणीं कोमलतरुतुल्य वृद्धि बांकेल, ही कवचीची स्थिति असल्या मुळे बाच सांपडतो. कवचीस सांधे आहेत ते लहानपणीं ढिले असतात, त्यामुळे मेंदूच्या वृद्धीस अडथळा येत नाहीं. पुढे पुढे सांधे खिळून गे- ल्यावर मार्ग न सांपडल्यामुळे आंतल्या आंत सळ पडूं लागतात. ह्मणजे मेंदूचा पृष्ठभाग वाढतो. एक ताजें बोर हातांत घे, आणि एक घे आक्रोड. बोरास सळ नसल्यामुळे त्याचा पृष्ठभाग मोजलास तर तो आक्रोडाच्या पृष्टभागापेक्षा कमी भरेल; सळांत पुष्कळसा भाग असतो. वोरावर बारीक सिगरेटचा कागद पाण्यांत भिजवून लावलास तर सारखा बसेल पण आक्रोडाच्या सळांत घालून चिकटविणे शक्य असल्यास जास्ती कागद लागेल. कागद प्रत्येक सळांतून बसवितांना तुझी धांदल उडेल, याकरितां नुसती कल्पना केलीस तरी पुरे आहे.