Jump to content

पान:स्मरणशत्त्कीची वृद्धी.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्मरणशक्तीची वृद्धी.

२७

बुद्धीच चालत नाहीं. लाकडासारखे सुखून गेलेले बैराग्याचे निरुपयोगी हात ! अखेर आपल्या वयाच्या पंचविसाव्या वर्षीच विचाऱ्याा श्रीमंत पण हतभाग्य प्राण्याला मरण आलें. आह्मी श्रीमंत, आह्मांला शिकून काय करायचें आहे, अस ह्मणणाऱ्या वेडगळांनी या प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार करावा. व्यवसायवैचित्र्य ह्मणजे कामांत जितका भिन्न भिन्न व्यवहार होईल तितका चांगला. मेंदूच्या प्रत्येक सळास वेगळें काम परमात्म्याने लावून दिलेले आहे, त्यामुळे एकाच प्रकारचा अभ्यास केल्यास एकच वाजू अथवा •सळ जास्ती वाढतो व धारवाडी कांटा बिघडतो. आपण रा. ब. दिना- नाथ आत्माराम दळवी यांचें उदाहरण घेऊं. गणितविषय त्यांचा लाडका असल्यामुळे त्यांनी त्याजकडे इतकें लक्ष दिले की न्यूटनच्या देखील एका प्रसिद्ध सिद्धांतास खोटें ठरविलें. यूरोप खंडांत सुद्धा त्यांची प्रसंशा व कीर्ति झाली. पण 'अति सर्वत्र वर्जयेत्' गणिताच्या नादांत रावसाहेब इतके भरले की न्यायासनावर बसल्यावर तेथेंही वादी, प्रतिवादी, साक्षीदार, वकील काय बोलतात, हें परमेश्वराला ठाऊक ! म्युनसिफ साहेबांच्या प्रोसि- डिंगांत गणिताचे सिद्धांत इकडून तिकडे चेंडूसारखे झुगारले जात. बदल्यावर बदल्या! अंखेर जुलमानें पेन्शन !

 तर मग व्यवस्थित रीतीनें मेंदूच्या सळांस योग्य तालीम देऊन त्यांज- कडून सारखें समतोल काम घेणें, हें महत्त्वाचें कर्तव्य विसरता कामा नये. मेंदू अंतर्वर्धक आहे ह्मणजे तो आंतून बाहेर वाढत जातो, हे कळण्याकरितां तुला वनस्पतिशास्त्राची थोडीशी माहिती देतों. झाडांत तीन मुख्य भाग आहेत. बाह्यवर्धक, अंतर्वर्धक व शिखरवर्धक आंवा, नारिंग, बेल, अगस्ता, हीं झाडें बाहेरच्या बाहेर वाढतात, झणजे त्यांच्या ओबड धोबड़ सालींच्या आंतल्या वाजूला एक अंतर साल असते तींत सर्व रस परिपक होऊन झाडाच्या बुंधावर एकावर एक थर दिल्याप्रमाणें पुढें वसून तीं जाड जाड होत जातात. पण ताड, नारळ, सुपारी, व वेत ( स. छडी ! ) ही झाडें आंतून ह्मणजे गर्भातून (गाभ्यांतून ) वाढतात. नवीन मांस