२३
गेली होती. घरांत चारच मुले शिल्लक होतीं. थोरला दादा, दुसरा भाऊ,
तिसरी मुलगी तारा, आणि चौथा गंपू देशमुखास पाहतांच मुलांची
गडवड उडाली, आनंदाने उड्या मारीत "बाबा, बाबा " करीत धांवत
त्यांच्या भोंवतीं जमून त्यांनी त्यांस गराडा घातला. त्यांच्या सुप्रसन्न मुखांकडे
पाहून देशमुखांचे काळीज सुपायेवढे झालें. येतांना त्यांच्या चिमुकल्या
जोड्यांचा फटफट होणारा आवाज मृदंगाप्रमाणे भासला, त्यांचे आनंदाचे
उद्गार अमृताप्रमाणे भासले. गंपूचा “ हो ! हो ! हो ! नाद गंधर्व-
गायनाप्रमाणे भासला. वागांत किती प्रकारची झाडें होतीं; त्यांची
व्यवस्था कशी होती, इत्यादि भाकडकथा सांगत मी बसत नाहीं.
चिमुकली तारा सहाच वर्षांची होती. तिच्या हातांतील गजरा मात्र
पाहण्यासारखा होता. एकीकडे गुलाब, एकीकडे शेवंती, एकीकडे वट-
मोगरा, एकीकडे गुलछडी, कशीबशी ठेवून मर्वीच पांचेचा झुवका लावून
केळांच्या सोपांनी गुंडाळीत गुंडाळीत घाईघाईनें स्वारी वावांकडे धांवत होती.
गजरा पुरा नव्हता झाला, पण तिच्या स्वतांच्या तोंडावरील टवटवीनेंच
त्याला अत्यंत शोभा आणली होती. दादाच्या हातांत एक चाबूक होता.
त्याचा फडाफड आवाज काढीत स्वारी येत होती. भाऊ घोड्याचें चित्र
घेऊन, गंपू एक कुत्र्याचें पोर बगलेंत मारून येत होता. सगळा
दिवस खेळण्यांत ! दादा व भाऊ शाळेत नांवाला जात होते, पण घरीं
आले की अनध्याय ! घोडे, गाड्या, खुबुतरें, बोकड, यांची चंगळ
असल्यामुळे त्यांतच गर्क असत. फार लहानपणी मुलांवर अभ्यासाचा चेप
नसावा असे देशमुखांचें ठाम मत असल्यामुळे, ते त्यांस खेळास उत्तेजन
देत. त्यांत देशमुखांचा एक भाऊ वी. ए. ची परीक्षा पास झाला,
नापास हा शब्द त्यांच्या स्वप्नांत सुद्धां आला नव्हता. पण पदवीदानाच्या
' समारंभांतच' तापानें फणफणून अस्तास गेला, याचें त्यांस फार वाईट
वाटत असे. हिरा गेला ! म्हणून नेहमीं हळहळत. यामुळेही त्यांच्या
वृत्तीत फरक पडला होता. मुलें मोकाट सोडतात, याजबद्दल त्यांजवर
टीका करणारे लोक नव्हते असें नाहीं. पण ते त्यांची परवा करीत