Jump to content

पान:स्मरणशत्त्कीची वृद्धी.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वैजयंतीचा मणि २ रा.
१८

झटलें, " ते लहान कुंड डाव्या कोपऱ्यांत आहे, तेथें मला आईनें आंघोळ घातली. तेथील बांधकाम पडलें होतें. " पडली ओळख ! पण शहापुरास खारींत जाईपर्यंत या गोष्टीचें कधीं स्मरणही झालेले आठवत नाहीं. तर मग फार दिवसांची गोष्टसुद्धां 'सान्निध्य -- सौख्य मार्गानें आठवते. चापटपोळी, हे आमचें त्या वेळचें सौख्य. तुला पाहिजे का रे बाळ्या ! देवापुढच्या नंदीवर वसूं नको हो ! पुढल्यास ठेच मागचा शहाणा !

 ज्य स्थितीत एकाचा मनुष्याच्या मनावर एकादा ठसा उम- टला असेल, त्याच स्थितीत त्यास पुनः ठेवला तर तेथील गोष्टींचे स्मरण होतें, हा नियम लक्षांत टेक.

           *          *

 गोष्ट अकरात्री:- - एक तरुण मुलगी एकदा आपल्या नातलगावरोवर एका खोलींत गेली, आणि एकदम चपापली. ह्मणतात डॉक्टर आचर कॉव्री. (भोचनगडांतील "ह्मणाला रांगड्या " माहीत आहे ना ? तसलीच ही वाक्यरचना. ) तिला कारण विचारतां ती हाणाली, " या खोलींत मी एकदा आलें होतें. त्या कोपऱ्यांतील पलंगावर एक बाई निजली होती. ती फार आजारी होती ! तिने माझे वारंवार मुके घेतले, व ती फार रडलीं." तपासांतीं कळून आले की ती बाई त्या मुलीची आईच होती. अखेरची भेट देण्याकरितां दुसऱ्या घरी मुलगी होती, तेथून तिला आणले होतें. मुलीला तर आपल्याला आई होती कीं नाहीं याचें स्मरणही नव्हतें. तिला दुसऱ्या एका बाईनें पोसलें होतें. तिलाच ती लहानपणी आपली आई समजत असे. पुढें वयांत आल्यावर मात्र ती आपली आई नव्हे हें तिला माहीत झालें होतें.

           *                    *                 *

 गोष्ट वारावी:- कोलरि साहेब सांगतातः -- एक तरुण मडम तापान फणफणली म्हणजे कांहीं बडबड करी. सगळे लाक हाणत " इला