त्यांचा तेथें संग्रह होतो. पण हे किरण जर मळमळीत असले, तर चांगला ठसा वठत नाहीं. याकरितां हे किरण तीव्र असतील तितके चांगले. सबब फोकस ह्मणजे किरणकेंद्र जरा नेटानें व बरोबर लावला पाहिजे. चष्म्याची कांच खालींवर करून तूं उन्हांत कापूस जाळतोस, त्याप्रमाणें विस्मरणरूपी कापूस जाळून टाकला पाहिजे ! त्याला काय केले पाहिजे ? तर तुझे कल्पित चंद्रसूर्य या दोघांच्या मदतीनेंच तर काय, पण त्यांच्यां- तील " प्रत्यक्ष संबंध जोडणाऱ्या तंतूची "ही मदत घ्यावी. तोंडानें बोलावें ( शब्द घोकावा ) हातानें लिहावें, लिहिलेला मजकूर डोळ्यांनीं वाचावा,व मधल्या तंतून त्याची पक्की गांठ मारात्री ! ही गांठ कशी मारावी, तें आख्यान पुढें पहा.
* * *
यदा येथें आल्यावर एकदा 'जेहेत्ते' असे झाले की "वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् " या श्लोकाचा आरंभ आह्मीं विसरलों! बराच वेळ 'झटपठादि खटपट' केली, पण दाद लागेना. मग इतर गोष्टींकडे लक्ष देऊन काम करू लागलों, पण मेंदू राजास हुकूम देऊन ठेवला होता, की स्मरण झालेच पाहिजे ! कचेरीत गेल्यावर सहज एका 'प्रुफा'कडे लक्ष गेलें. त्यांत हिंदुस्थानांतील कांहीं जातींचें वर्णन होतें.. 'जात' शब्द डोळ्यासमोर उभा राहतांच 'शेणवी' शब्द आला. आ- आमच्या नाटकगृहांतील रंगभूमी ठाऊक आहे ना? तसेंच हें. आमच्या ज्ञानचक्षूंनी त्याच्याकडे नजर फेंकतांच त्याची शांतादेवी समोर उभी ! दुसरें पात्र! शांतादेवीचें पुण्यदर्शन होतें न होतें तों "शांताकारं भुजग- शयनं पद्मनाभं सुरेशम् " स्मरणमणिमाला तयार ! शाबास ! फत्ते !
- * * *
हीच ती स्मरणमाला वरें! दुसरें उदाहरण घ्या. आमच्या लहानपणीं मराठी शाळेंत भुगोल शिकतांना तें भिकारडें मादागास्कर वेट लक्षांत ठेव-
- तांना आह्नीं आपल्या एका ओळखीच्या मुलाची व त्याची गांठ मारून