पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/८१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाहेर पडलो होतो. उरलेली कहाणी ती सांगत असताना रामसिंग मध्येच काहीतरी बोलत होता. त्यामुळं शंका वाढत होत्या. 'सोनोग्राफीसाठी कुणी आणि किती पैसे दिले, असं आम्ही त्याला विचारलं. त्यानं हजार रुपये दिल्याचं सांगितलं. 'गर्भपातानंतर गर्भ कुठे टाकला, या प्रश्नाला त्यानं 'माहीत नाही, असं उत्तर दिलं होतं. पण त्याच्या बायकोला एकान्तात विचारल्यावर ती म्हणाली, "टाकून कसं देईन? शेवटी तो पण जीवच आहे की! मी घेऊन आले. माहेरी नेलं आणि नीरा नदीच्या डोहात पुरलं. हे सगळं करताना रामसिंग तिच्याबरोबरच होता, ही गोष्ट रामसिंगनं लपवून ठेवली होती. मग रामसिंगला बोलावून रुजवात केली. सगळं सत्य समोर आलं होतं. आता नीरा नदीच्या डोहात पुरलेला गर्भ शोधून काढण्याचं खडतर आव्हान समोर उभं होतं.

 जिल्हाधिकाऱ्यांना भेटून डोहातून गर्भ उकरून काढण्याची परवानगी मागितली. त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीत त्यांची बैठक सुरू होती. पण बैठक संपेपर्यंत थांबायला आम्हाला वेळ नव्हता. त्याच बैठकीत खंडाळ्याचे तहसीलदार बसले होते. त्यांच्या नावे परवानगी मागणारं पत्र दिलं. शिरवळ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागणार होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांना तशी विनंती केली, तेव्हा त्यांनी शिरवळ पोलिस ठाण्याला फोनवरून तसं कळवलं. शिरवळ पोलिसात झिरो नंबरनं नोंद केली. कॉन्स्टेबल सोबत घेऊन रामसिंगच्या सासऱ्याकडे गेलो. त्याला सोबत घेऊन नीरा नदीच्या त्या डोहाकडे निघालो, तेव्हा अंधार पडला होता. नदीपात्रातल्या चिखलातून चालवत म्हाताऱ्यानं आम्हाला चांगलं अडीच किलोमीटर आत नेलं. पाय घसरत होते. चिखलात रुतत होते. पण आम्ही चालत राहिलो. अंधार पडल्यामुळं नेमकं ठिकाण सापडेना. जेव्हा म्हाताऱ्यानं ठिकाण खवलं तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते. रात्री उकरू शकत नाही, असं पोलिसांनी गितलं; पण रात्रीत कुणी गर्भ गायब केला तर...? शेवटी तहसीलदारांना सांगितलं, “इथं नदीपात्रात गार्ड लावा... रात्रभर... सकाळी शोधायचं ना? मग लावा पहारा. तहसीलदारांनी दोन पोलिसांना तिथंच, नदीपात्रात पहायला उभं केलं. रात्रभर दोघं पाण्यात उभे होते.

 हे सगळं सुरू असेपर्यंत रामसिंगचा सासरा वेगवेगळ्या सबबी सांगत राहिला. “फार खणलं नव्हतं आम्ही. आता नदीला पाणी वाढलंय. गेलं असेल वाहून,

७७