स्वतंत्रपणे चालवलेल्या पहिल्या खटल्यात डॉक्टरांना तीन वर्षांचा सश्रम कारावास, दहा हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत निकाल लागलेला हा देशातला पहिला खटला ठरला. या खटल्याचं निकालपत्र सर्व संबंधितांनी अभ्यास करावं, असं आहे. एकंदर नऊ कलमं शाबीत झाली आणि प्रत्येक कलमाखाली वेगवेगळी शिक्षाही ठोठावली गेली. परंतु सगळ्या शिक्षा एकाच वेळी भोगायच्या असल्यामुळं डॉक्टरांना तीन वर्षेच तुरुंगात जावं लागणार होतं. निकालपत्रात न्यायालयानं जी टिपणी केली आहे, ती उद्बोधक आहे. न्यायाधीशांनी आपल्याकडची मुलगा जन्माला घालण्यासाठी महिलेवर कुटुंबात किती दबाव असतो आणि त्यामुळं असे प्रकार करणाऱ्यांचं कसं फावतं, याचं समर्पक चित्र असला, तरी आमच्या मनाला वेगळीच चुटपूट लागून राहिली. ती आजतागायत कायम आहे. डॉक्टरांच्याविरुद्धच्या दुसऱ्या खटल्यात प्रमुख साक्षीदार असलेली ती अभागी महिला कुठं आहे, हे आजही आम्हाला ठाऊक नाही. एखादा मोठा विजय मिळावा आणि त्याला अशी जिव्हारी लागणारी दुखरी किनार असावी, याला काय म्हणायचं!
पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/७७
Appearance